FUEL PRICE HIKE IN INDIA BUT PETROL DIESEL CHEAPER IN PORT BLAIR Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel : देशातील 'या' शहरात मिळतंय सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल, कारण काय? जाणून घ्या

Petrol Diesel Price Hike News : देशात पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ होत असताना पोर्ट ब्लेअरमध्ये मात्र इंधन तुलनेने स्वस्त आहे. कमी कर आणि स्थानिक धोरणांमुळे येथे दर कमी असून, महागाईच्या पार्श्वभूमीवर ही बाब नागरिकांसाठी दिलासा देणारी ठरत आहे.

Alisha Khedekar

  • पेट्रोल-डिझेल दरात प्रति लिटर ३ रुपयांची वाढ

  • कच्च्या तेलाच्या किमती आणि आंतरराष्ट्रीय तणाव हे मुख्य कारण

  • पोर्ट ब्लेअरमध्ये इंधन १०-१५ रुपये स्वस्त

  • कमी कर आणि स्थानिक धोरणांमुळे दर कमी

  • इंधन दरवाढीमुळे महागाई वाढण्याची शक्यता

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा ताण आला आहे. पश्चिम आशियातील वाढता तणाव, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती यामुळे सरकारी तेल कंपन्यांनी इंधन दरात प्रति लिटर ३ रुपयांची वाढ केली आहे. या निर्णयाचा थेट परिणाम दिल्ली, मुंबईसारख्या प्रमुख शहरांतील नागरिकांवर झाला असून, आधीच महागाईने त्रस्त असलेल्या लोकांसाठी ही वाढ आणखी डोकेदुखी ठरत आहे.मात्र, या सर्व परिस्थितीत देशात एक असे ठिकाण आहे जिथे पेट्रोल आणि डिझेल तुलनेने स्वस्त दरात मिळत आहे. ते शहर कोणतं आहे, तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या

अंदमान आणि निकोबार बेटांची राजधानी पोर्ट ब्लेअर येथे इंधनाचे दर इतर महानगरांच्या तुलनेत १० ते १५ रुपयांनी कमी आहेत. सध्या पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोलचा दर सुमारे ८४.९९ रुपये प्रति लिटर असून डिझेलची किंमत ८०.६४ रुपये आहे. ही दररचना देशातील इतर भागांतील ग्राहकांसाठी आश्चर्यकारक ठरत आहे.

पोर्ट ब्लेअरमध्ये इंधन स्वस्त असण्यामागे मुख्य कारण म्हणजे कमी कर आणि व्हॅट दर. अनेक राज्य सरकारे महसूल वाढवण्यासाठी पेट्रोल-डिझेलवर जास्त कर लावतात, तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये तुलनेने कमी कर आकारला जातो. त्यामुळे ग्राहकाला इंधन स्वस्त मिळते. याशिवाय स्थानिक धोरणांमुळेही दर नियंत्रणात राहतात.

या दरवाढीचा परिणाम केवळ वाहनचालकांपुरता मर्यादित राहत नाही. वाहतूक खर्च वाढल्याने अन्नधान्य, भाजीपाला, फळे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांवर याचा मोठा परिणाम दिसून येतो. तज्ज्ञांच्या मते, जर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढल्या, तर देशातील इंधन दर पुन्हा वाढू शकतात. अशा परिस्थितीत महागाई अधिक वाढली जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT