नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crud Oil) दरात चढ-उतार सुरू आहे. बुधवारी कच्च्या तेलाच्या दरात प्रतिबॅरेल 9 डॉलरची घसरण झाली होती. आज म्हणजेच गुरुवारी सुद्धा कच्च्या तेलाचे प्रतिबॅरेल 10 डॉलर्सनी घसरले आहेत. त्यामुळे कच्च्या तेलाच्या देर 100 डॉलरच्या खाली आले आहेत. दरम्यान, कच्च्या तेलाच्या दरात घसरण होताच भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे (Petrol-Diesel) दर जारी केले आहेत. (Petrol Diesel Latest Price Today)
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण सुरूच असून ब्रेंट क्रूड दोन महिन्यांत प्रथमच 100 डॉलरपर्यंत खाली आले आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात कोणताही बदल केलेला नाही. दिल्लीत अजूनही पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटर मिळत आहे.
विशेष बाब म्हणजे 6 एप्रिलपासून पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. तर क्रूडच्या किमती एका वेळी प्रति बॅरल 140 डॉलरवर गेल्या होत्या. बुधवारी सकाळी ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 105.4 डॉलर होती, ज्यामध्ये आज सकाळी प्रतिबॅरेल 10 डॉलरची घसरण झाली आहे. (Petrol Diesel Price Today)
दरम्यान, गुरूवारी सकाळी जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 109.27 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 95.84 रुपये एवढा आहे.
4 प्रमुख महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर
मुंबई - मुंबईत पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 95.84 रुपयांनी विकलं जातंय.
दिल्ली - दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 96.72 आणि डिझेलचा दर 89.62 इतका आहे.
चेन्नई - चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रतिलिटर इतक्या दराने विकलं जातंय.
कोलकाता - कोलकत्यामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.03 रुपये आणि डिझेल दर प्रतिलिटर 92.76 रुपये इतका आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.