सावधान! पावसाळ्यात पर्यटनस्थळांवर फिरायला जाताय? मग ही बातमी वाचाच....

अंबरनाथ तालुक्यातील पर्यटन क्षेत्रांवर मनाई आदेश लागू करण्यात आलेत.
Ambarnath News
Ambarnath News Saam Tv

अंबरनाथ : तुम्ही जर पावसाळ्यात पर्यटन क्षेत्रात फिरण्यास जात असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण, अंबरनाथ तालुक्यातील पर्यटन क्षेत्रांवर मनाई आदेश लागू करण्यात आलेत. पावसाळ्यात होणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी ४ जुलैपासून ३१ ऑगस्टपर्यंत लागू राहतील, अशी माहिती अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांती माने यांनी दिली आहे. (Amarnath Latest Marathi News)

Ambarnath News
Eknath Shinde: अपघातग्रस्त वारकऱ्यांच्या मदतीला 'एकनाथ' धावले; स्वखर्चाने करणार उपचार

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अंबरनाथ तालुक्यात कोंडेश्वर, बारवी नदी, चिखलोली अशी जवळपास सात ते आठ पर्यटन क्षेत्र आहेत. विशेषतः पावसाळ्यात मुंबई, ठाणे आणि जवळपासच्या भागातून याठिकाणी मोठ्या संख्येनं पर्यटक पावसाळी सहली आणि पिकनिकसाठी येत असतात.

यंदाच्या वर्षी अंबरनाथ तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळांवर मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. ४ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत हे आदेश लागू राहणार असून यादरम्यान या सर्व पर्यटन क्षेत्रांच्या ३ किलोमीटरच्या परिघात जाण्यास मनाई असणार आहे, अशी माहिती अंबरनाथच्या तहसीलदार प्रशांत माने यांनी दिली आहे. (Amarnath Marathi News)

Ambarnath News
उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणी आरोपींच्या घरासह १७ ठिकाणी NIA ची छापेमारी

अंबरनाथ तालुक्याच्या ग्रामीण भागात असलेल्या या पर्यटन क्षेत्रांवर पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्यानं या पर्यटकांसाठी चहा, नाश्त्याची दुकानं लावून स्थानिकांना मोठा रोजगार मिळत असतो.

मात्र या मनाई आदेशामुळे स्थानिकांचा रोजगार बुडणार असल्यानं नाराजी व्यक्त होतेय. मात्र पर्यटकांचा अतिउत्साह आणि उन्माद पाहता शासनाने घेतलेला हा निर्णय योग्य असल्याचं मत देखील दुसरीकडे व्यक्त होतंय.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com