Eknath Shinde: अपघातग्रस्त वारकऱ्यांच्या मदतीला 'एकनाथ' धावले; स्वखर्चाने करणार उपचार

मिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून या अपघाताबाबत माहिती घेऊन या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शवली आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSaam Tv
Published On

मुंबई : शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले आहे. मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेताच त्यांनी कामाचा धडाका लावला आहे. कालपासून मुख्यमंत्री शिंदे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत (Video) ते अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांना लागेल ती मदत करा मी आहे, असं बोलताना दिसत आहेत.

सांगली येथील रस्ते अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले. मिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून या अपघाताबाबत माहिती घेऊन या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

Eknath Shinde
Daily Horoscope : आजचे राशीभविष्य 7 जुलै 2022

पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या अपघात

मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी फाट्याजवळ आज एक भीषण अपघात घडला. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पीक अप जीप घुसून झालेल्या या अपघातात १४ वारकरी जखमी झाले. जखमींना तातडीने मिरज सिव्हिल आणि कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मिरजेचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश शिंदे यांना फोन लावून या वारकऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यासोबत त्यांना लागतील ते सर्व उपचार करावेत. वेळ पडल्यास त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात (Hospital) दाखल करावे त्यांच्यावरील उपचारात कोणतीही कसूर ठेवू नका असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यासाठी लागेल तो खर्च उचलण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली.

Eknath Shinde
कामाख्या देवीने कोणाचा बळी घेतला? खासदार श्रीकांत शिंदेंचा नाव न घेता राऊतांना टोला

या रस्ते अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. त्यांना लागतील ते सर्व उपचार देऊ असे डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

आषाढी वारी अगदी २-३ दिवसांवर येऊन ठेपलेली असताना घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे यंदाच्या वारीला गालबोट लागलं होतं. मात्र वारकऱ्यांच्या मदतीला खुद्द 'एकनाथ' धावून आल्याने सर्वसामान्य लोकांच्या मदतीसाठी तत्पर असलेला मुख्यमंत्री अशी शिंदे यांची ओळख नव्याने अधोरेखित झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com