सुशांत शिंदे -
मुंबई : सर्व आमदार गुवाहाटी येथे असताना कोण रिक्षा वाला, कोण टपरीवाला म्हणाले तर म्हणाले आम्ही रेडे पाठवले आहेत असंही काहीजण म्हणाले. पण ही आपली संस्कृती नाही. आज त्याच कामाख्या देवीने कोणाचा बळी घेतला? असा प्रश्न उपस्थित करत खासदार श्रीकांत शिंदे (MP Shrikant Shinde) यांनी संजय राऊतांना टोला लगावला. शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांच्या समर्थनार्थ आज नॅशनल पार्क ते मागा ठाणे पर्यंत रॅली काढली होती. या रॅलीला खासदार शिंदे (MLA Prakash Surve) उपस्थित राहिले होते यावेळी ते बोलत होते.
सर्व बंडखोर आमदार गुवाहाटी (Guwahati) येथील हॉटेलमध्ये वास्तव्यास असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका भाषणात कामाख्या देवीला बळी देण्यासाठी आपण ४० रेडे पाढवले असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्याचा श्रीकांत शिंदे यांनी समाचार घेतला आहे.
खासदार शिंदे म्हणाले, 'आपण जो निर्णय घेतला त्याच्या मागे जनता आहे, काही लोकांनी वलग्ना केल्या की, जेव्हा हे आमदार येतील तेव्हा त्यांचे लोक कशा पद्धतीने स्वागत करतील, जे कधी नगरसेवक आणि आमदार निवडून आणू शकत नाही ते वलग्ना करत आहेत असा टोलाही त्यांनी राऊतांना लगावला.
पाहा व्हिडीओ -
तसंच १५ ते २० दिवस बाहेर राहून सुद्धा लोक यांच्या बाजूने आहेत. शिवाय आमदार बाहेर असताना, काही लोकांनी टीका केली, 'कोण रिक्षा वाला, कोण टपरीवाले म्हणाले, काही जण तर म्हणाले आम्ही देवीला बळी देण्यासाठी ४० रेडे पाठवले, ही आपली संस्कृती नाही. मात्र, आज त्या कामाख्या देवीने बळी कुणाचा घेतला? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. शिवाय फक्त मी खरा बाकी सगळे गद्दार असं काही जणांना वाटतं असंही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, यावेळी बोलताना प्रकाश सुर्वे म्हणाले, मी आज एकालाही फोन करून येथे बोलावलं नाही. मी गोरगरीबांचा आमदार आहे. अजित पवार यांना म्हणालो मला निधी द्या, ते मला म्हणाले, 'मी कुठून तुला निधी देऊ, माझ्या पाठिशी तेव्हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) होते. शिवाय त्यांनी मला काहीही बोलू दे आपण त्यांच्या विरोधात बोलायचं नाही. तुम्ही माझ्यावर असेच प्रेम ठेवा असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं.
आदित्य ठाकरे आणि सुर्वेंचा व्हिडीओ झालेला व्हायरल...
आदित्य ठाकरे आणि प्रकाश सुर्वे यांचा एक विधीमंडळाच्या आवारातील एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये सुर्वे यांनी बंडखोरी केल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी त्यांना जाब विचारला होता. आदित्य ठाकरे त्यांना म्हणाले होते, एवढे जवळचे असून असं काही कराल हे वाटलं नव्हतं. काय सांगाल मतदारसंघात, असं कराल खरंच अपेक्षित नव्हतं. माझं तुमच्यावर खरोखर प्रेम होतं. हे तुम्हाला माहिती आहे अशी भावनिक साद आदित्य ठाकरेंनी सुर्वेंना घातली होती.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.