कामाख्या देवी म्हणाली 'तो' रेडा आम्हाला नको; एकनाथ शिंदेंचा राऊतांना टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत तुफान फटकेबाजी केली
Sanjay Raut vs Eknath Shinde
Sanjay Raut vs Eknath ShindeSaam TV

मुंबई : अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज शिंदे-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारची बहुमत चाचणी पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सभागृहात आपलं मत व्यक्त केलं. यावेळी शिंदे म्हणाले, 'लढून शहीद झालो तरी चालेल, पण आता माघार घेणार नाही. काही लोकं म्हणत होते की, आम्ही 40 रेडे पाठवले. पण मॉं कामाख्या देवी बोलली, जो बोलला आहे तो रेडा आम्हाला नको', असं म्हणत एकनाथ शिंदेंनी संजय राऊत (Shivsena) यांना नाव न घेता टोला लगावला. (CM Eknath Shinde latest News)

Sanjay Raut vs Eknath Shinde
CM Eknath Shinde | लढून शहीद झालो तरी चालेल, पण आता माघार नाही : एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी कालही शिवसैनिक होतो आणि आजही शिवसैनिक आहे. माझा जो अजेंडा आहे तो मी कधीच सोडू शकत नाही. त्यामुळे काही लोकं आता सांगत होते, कुणी आम्हाला गटार नाल्याची घाण म्हणून संबोधत होते. कुणी म्हणत होतं की, कामाख्या देवीला बळी देणार, आता कामाख्या देवींनी कुणाचा बळी घेतला. असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला.

इतकच नाही तर, काही लोकं म्हणत होते की, कामाख्या देवीला आम्ही 40 रेडे पाठवले. पण काही लोकं आमचा बळी देण्यापासून ते काहीही बोलत होते. मॉं कामाख्या देवी बोलली, जो बोलला आहे तो रेडा आम्हाला नको', असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना नाव न घेता टोला लगावला आहे.

Sanjay Raut vs Eknath Shinde
माझी टिंगलटवाळी करणाऱ्यांचा मी बदला घेणार; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले वाचा...

पुढील निवडणुकीत 200 आमदार निवडून आणणार

अजित पवार म्हणाले, पुढच्यावेळी बंडखोर आमदार निवडून येणार नाहीत. मात्र, आम्ही शिवसेना सोडलेली नाही. भाजपासोबत आम्ही पुढील विधानसभा निवडणुकीत २०० आमदार निवडून आणू , असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

अजित पवार यांनी माझ्या खात्याच्या बैठका घेतल्या तरी मी त्यांना काही बोललो नाही. त्यांनी ८०० कोटी रुपये घेतले तरी मी काही बोललो नाही. मात्र, तुम्ही समांतर नगरविकास खात्याचा प्रमुख का केला? असा सवालही त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना केला आहे.

Edited By Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com