Petrol Diesel Latest Price Saam tv
देश विदेश

Petrol Diesel Price : गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करताय? आधी आजचे पेट्रोलचे दर जाणून घ्या

Petrol Diesel Price News : जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

वृत्तसंस्था

Petrol Diesel Rate : आज जागतिक बाजारपेठेत क्रूडच्या किमतीत थोडी घसरण दिसून येत असून ब्रेंट क्रूडची किंमत 78 डॉलरच्या आसपास पोहोचली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी सकाळी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्येही बदल दिसून येत आहेत.

देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दारात बदल करण्यात आला आहे. मात्र, असे असेल तर दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये आजही इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.  (Latest Marathi News)

गौतम बुद्ध नगर (नोएडा) येथे पेट्रोल 0.28 पैशांनी स्वस्त होऊन 96.64 रुपये प्रति लिटर झाले, तर डिझेल0.26 पैशांनी घसरून 89.82 रुपये प्रति लिटर झाले. गाझियाबादमध्ये पेट्रोल (Petrol) 0.32 पैशांनी महागले असून 96.58 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे, तर डिझेल 0.30 पैशांनी वाढले असून 89.75 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. यूपीची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल 0.14 पैशांनी महागले असून ते 96.57 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेल (Diesel) 0.13 पैशांनी वाढून 89.76 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या आरोपांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे सडेतोड उत्तर

West Bengal: भाजप- टीएमसी कार्यकर्त्यांमधील वाद चिघळला, भाजप नेत्यावर बॉम्ब फेकल्याचा आरोप; १०० जण जखमी

Mangla Aditya Rajyog: 4 दिवसांनी बनणार आदित्य मंगळ राजयोग; या राशींच्या हाती लागणार पैसाच पैसा

Face Care: मॉइश्चराज आणि ग्लोईंग स्किनसाठी वापरा हा घरी बनवलेला फेसमास्क, ५ दिवसात दिसेल फरक

शक्तीपीठ महामार्गावरून शिंदेंच्या शिवसेनेत मतभेद, २ आमदारांमध्येच जुंपली

SCROLL FOR NEXT