Petrol Diesel Prices Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel Price : 'या' शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर वाढले; चेक करा आजचे इंधनाचे दर

Petrol Diesel Price News : जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

वृत्तसंस्था

Petrol Diesel Rate : कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढू लागल्या असून बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी कच्च्या तेलाच्या दरात वाढ दिसून आली. ब्रेंट क्रूड आता 80 डॉलरच्या आसपास पोहोचले आहे. दरम्यान, सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्येही बदल दिसून येत आहे. आज अनेक शहरांमध्ये तेलाच्या किरकोळ किमती वाढल्या आहेत. (Latest Marathi News)

गौतम बुद्ध नगर (नोएडा) येथे पेट्रोल 25 पैशांनी महागून 96.92 रुपये प्रति लीटर झाले, तर डिझेल 24 पैशांनी महागले आहे. यूपीची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल (Petrol) 14 पैशांनी महागले असून ते 96.43 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेल (Diesel) 13 पैशांनी वाढून 89.65 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे पेट्रोल 50 पैशांनी महाग होऊन 108.12 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेल 47 पैशांनी वाढून 94.86 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; उद्याही शाळांना सुट्टी मिळणार का?

Shocking : खळबळजनक! प्रेमात पतीचा अडथळा, पत्नीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काटा; शीर धडावेगळं केलं

एकनाथ महाराजांची पालखी रोखणार? ऐन वारीत जुना वाद उफाळला; वारकरी चिंतेत

Maharashtra News Live Update: नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवला

रक्षकच बनला भक्षक! अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ, पोलीस उपनिरीक्षकाला ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT