Mumbai News: नायर रुग्णालयातील ४० वर्षीय रुग्णाने केली आत्महत्या; कारण अद्याप गुलदस्त्यात

मुंबईतील नायर रुग्णालयात आज एका ४० वर्षीय रुग्णाने आत्महत्या केली आहे.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam tv

Mumbai News : मुंबईतील नायर रुग्णालयात आज एका ४० वर्षीय रुग्णाने आत्महत्या केली आहे. या रुग्णाने आज सकाळी नायर रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. अविनाश सावंत असे या आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज मंगळवारी नायर रुग्णालयातील एका ४० वर्षीय रुग्णाने आत्महत्या केली. या रुग्णाने आज सकाळी नायर रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. (Latest Marathi News)

Mumbai Crime News
Maharashtra Corona Update: टेन्शन वाढलं; राज्यात गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांची संख्या ४०० पार, तिघांचा मृत्यू

अविनाश सावंत असे या रुग्णाचे नाव आहे. तर अविनाश सावंत हे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होते. त्यांना हृदयविकाराचा त्रास असल्याने काही महिन्यांपूर्वी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते.

अविनाश सावंत यांच्यावर नायर रुग्णालयात उपचार सुरू होते. अविनाश सावंत यांच्या आत्महत्येप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी (Police) अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

Mumbai Crime News
Nashik Crime News : कौटुंबिक वादातून जावयाने केलं सासू अन् मेव्हणीसोबत भयंकर कृत्य; नाशिक येथील धक्कादायक घटना

आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र आजारपणामुळे त्याने आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा संशय आहे. अविनाश सावंत यांच्या आत्महत्येने त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

नेमकं काय घडलं?

एका कर्मचाऱ्याने सांगितले की, कॉर्डियोलॉजी विभागातील एचडीयू वार्डमध्ये दाखल करण्यात आले होते. आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास अविनाश हे शौचालयास गेले. त्यांनी शौचालयाच्या खिडकीतून उघडून आत्महत्या केली. अविनाश यांना अन्य रुग्णांच्या नातेवाईकांनी जाताना पाहिले होते, मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, अविनाश यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com