Maharashtra Corona Update: टेन्शन वाढलं; राज्यात गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांची संख्या ४०० पार, तिघांचा मृत्यू

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे.
Maharashtra Corona Update
Maharashtra Corona UpdateSaam Tv

रुपाली बडवे

Maharashtra Corona Update: राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आज राज्यात कोरोनाच्या ४५० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या राज्यात सक्रिय रूग्णांची संख्या आता २३४३ वर पोहोचली आहे. (Latest Marathi News)

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात ४५० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर ३१६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७९,९१, ७२८ इतकी झाली आहे.

Maharashtra Corona Update
H3N2 Update News: पिंपरी चिंचवडमध्ये H3N2 धोका वाढला, एका रुग्णाचा मृत्यू; शहरात सध्या 17 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

आज दिवसभरात राज्यात ३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे . तर राज्यात आज रोजी २,३४३ सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत कोरोनाचे सक्रिय रुग्ण ६६३ , तर पुण्यात ६०४, ठाण्यात ४२९ रुग्ण आहेत. तर पालघरमध्ये २८, रायगड ७५ सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यात H3N2 आणि H1N1 धोका वाढला

कोरोनासोबतच राज्यात H3N2 व्हायरसचा धोका वाढत आहे. पिंपरी चिंचवडमध्ये वृद्ध महिलेचा H3N2 व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तर मुंबईतही H3N2 आणि H1N1 च्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मार्च महिन्यात सर्वाधिक एच३एन२ च्या रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत पालिकेच्या रुग्णालयात १४ रुग्ण दाखल आहेत. त्यात ९ रुग्ण 'एच३ एन२'चे तर ५ रुग्ण 'एच१ एन१'चे आहेत.

शंभूराज देसाईंना कोरोनाची लागण

राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांना आज कोरोनाची लागण झाली. त्यानंतर आता शिंदे सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई यांना कोरोनाची लागण झाली आहे. शंभूराज देसाई यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली आहे. शंभूराज देसाई यांनी म्हटले की, 'माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी गृह विलगीकरणात डॉक्टरांकडून उपचार घेत आहे. माझी प्रकृती ठीक असून काळजी करण्याचे कारण नाही'.

'गेल्या तीन-चार दिवसांमध्ये माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी त्यांना काही लक्षणे आढळल्यास त्वरित कोविड चाचणी करून घ्यावी, ही विनंती आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन यानिमित्ताने करतो, असेही त्यांनी म्हटले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com