Petrol Diesel Price
Petrol Diesel Price SaamTV
देश विदेश

Petrol Desel Price : पेट्रोल 109 रुपयांच्या पुढे, डिझेलही 95 रुपयांच्या जवळ; झटपट चेक करा आजचे इंधनाचे दर

वृत्तसंस्था

Petrol Diesel Rate : जागतिक बाजारात कच्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे पुन्हा एकदा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्ये आज बदल झाला असून पेट्रोल 109 रुपयांच्या पुढे गेले आहे.

देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. अनेक शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दारात बदल करण्यात आला आहे. मात्र, असे असेल तर दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चार महानगरांमध्ये आजही इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.  (Latest Marathi News)

गाझियाबादमध्ये पेट्रोल 0.32 पैशांनी स्वस्त होऊन 96.26 रुपये प्रति लीटर झाले, तर डिझेल (Diesel) 0.30 पैशांनी घसरून 89.45 रुपये प्रति लिटर झाले आहेत. हरियाणाची राजधानी गुरुग्राममध्ये पेट्रोल 0.4 पैशांनी महागले असून ते 96.97 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहे, तर डिझेल 0.4 पैशांनी वाढून 89.84 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये पेट्रोल (Petrol) 0.68 पैशांनी महाग होऊन 109.46 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेल 0.62 पैशांनी वाढून 94.61 रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 06.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

SCROLL FOR NEXT