
Solapur News : दिग्दर्शक नागराज मंजुळे हिंदी आणि मराठी या दोन्ही सिनेसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. मंजुळे यांच्या सिनेमांचा मोठा चाहता वर्ग आहे. सध्या नागराज मंजुळे यांचा 'घर बंदूक बिर्यानी' यांचा नवा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. याचदरम्यान, नागराज मंजुळे यांनी आत्मचरित्र लिहिण्यावर भाष्य केलं आहे. (Latest Marathi News)
नागराज मंजुळे (Nagraj Manjule) हे 'घर बंदूक बिर्यानी' सिनेमाच्या प्रमोशनसाठी सोलापुरात आले होते. यादरम्यान, नागराज मंजुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी नागराज मंजुळे म्हणाले, 'स्वत:चं आत्मचरित्र लिहिण्याचा सध्या माझा कोणताही विचार नाही. पण भविष्यात आत्मचरित्र लिहावं वाटलं, तर नक्कीच लिहीन'.
खरंतर फँड्री आणि सैराट हे सिनेमा हे माझं आत्मचरित्रच आहेत. या सिनेमावर माझं मत मांडलं आहे. माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत काहीच लपून राहीलेलं नाही. माझ्या सर्वच गोष्टी लोकांना माहिती आहेत, असेही नागराज मंजुळे म्हणाले.
'घर बंदूक बिर्यानी' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला
नागराज मंजुळे नेहमीच विविध धाटणीचे आणि वेगळ्या आशयाचे चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. लवकरच त्यांचा 'घर बंदूक बिर्यानी' हा झी स्टुडिओज निर्मित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये नागराज मंजुळे एक नव्या रूपात दिसणार आहेत. त्यांची ही भूमिका प्रेक्षक किती पसंत करतात हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आपल्याला कळेल.
नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओजने मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके चित्रपट दिले आहेत. हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित 'घर बंदूक बिर्यानी' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. याबरोबरच या चित्रपटात सयाजी शिंदे (Sayaji Shinde) , नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.