Petrol Diesel Prices Today Saam TV
देश विदेश

Petrol Diesel Price : कच्च्या तेलाचा पुन्हा भडका! इंधनाच्या किमतींबाबत मोठी अपडेट

Petrol Diesel Price News : जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

Shivani Tichkule

Petrol Diesel Rate : जागतिक बाजारात क्रूडच्या किमतीत पुन्हा एकदा उसळी पाहायला मिळत आहे. त्याचा परिणाम बुधवारी सकाळी जारी झालेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींवरही दिसून आला आणि आज नोएडा, गाझियाबाद व्यतिरिक्त लखनऊमध्येही इंधनाच्या किमती वाढल्या आहेत. मात्र, दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये आजही तेलाचे दर स्थिर आहेत. (Latest Marathi News)

गौतम बुद्ध नगर (नोएडा) येथे पेट्रोल (Petrol) 6 पैशांनी महागले असून ते 97.00 रुपये प्रति लीटर झाले आहे, तर डिझेल 5 पैशांनी वाढून 90.16 रुपये प्रति लिटर झाले आहे. गाझियाबादमध्ये आज पेट्रोल 14 पैशांनी महागले आहे आणि ते 96.58 रुपये प्रति लिटर झाले आहे, तर डिझेल 13 पैशांनी वाढले आहे आणि ते 89.75 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. यूपीची राजधानी लखनऊमध्येही पेट्रोल 5 पैशांनी महागून 96.62 रुपये प्रति लीटर झाले आहे, तर डिझेल (Diesel) 5 पैशांनी वाढून 89.81 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITBP Recruitment: १२ वी पास तरुणांना ITBP मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, महिना ९२००० रुपये पगार, अर्ज कसा करावा?

Astro Tips: हातात घड्याळ घालताय? या चुका टाळा अन्यथा...

'ये तुम्हारे कर्मों का फल है...'चाहत अन् रजतमध्ये कडाक्याचे भांडण 'Bigg Boss' मध्ये मोठा ड्रामा, पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: मुंबईच्या पोलिस नियंत्रण कक्षाला बाॅम्ब ठेवल्यााबाबत धमकीचा फोन

Railway Jobs: रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; या पदांसाठी भरती सुरु, पात्रता आणि अर्जप्रक्रिया काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT