Mumbai Crime News: पुढे हत्या झालीय, दागिने घालून रस्त्याने जाऊ नका; पोलीस असल्याची बतावणी करून महिलेला 1.22 लाखांचा गंडा

Mumbai News : आरोपींकडून सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. फसवणूक करणारी ही आंबिवलीची टोळी आहे.
Mumbai News
Mumbai News Saam TV
Published On

संजय गडदे

Mumbai News : मुंबईच्या सांताक्रुज परिसरात रस्त्याने चाललेल्या महिलेला पोलिस असल्याची बतावणी करून दोन अनोळखी इसमाने तिच्या जवळील सुमारे १.२२ लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या घेऊन पोबारा केला.

मात्र महिलेला संशय आल्याने महिला आरडा ओरड करताच तिथे पोलिसांची गाडी आल्यामुळे तात्काळ दोन्ही चोरांना तात्काळ अटक करून जप्त केला.आसिफ सय्यद आणि शेरू जाफर अशी त्या दोघांची नावे आहेत. सय्यद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात २७ तर जाफरविरोधात ७ गुन्हे दाखल आहेत. (Crime News)

Mumbai News
Saamana Editorial on BJP: भाजपचे हिंदुत्व ढोंगी , तर मुस्लिम प्रेमदेखील मतलबी; 'सामना'तून जोरदार टीका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी फिर्यादी महिला सांताक्रुज परिसरातील हायलाईफ मॉलच्या समोरील रस्त्यावरून जात असताना दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळ येऊन बोलू लागल्या.

पुढे एकाची हत्या झाली आहे, सोन्याचे दागिने घालून रस्त्याने जाऊ नका, तुमचे दागिने काढून पिशवीत ठेवा असे सांगून महिलेच्या हातातील सोन्याच्या दोन बांगड्या काढून हातात दिल्या ,एक आरोपीने त्या वस्तू कागदात गुंडाळून देतो असे सांगून खिशातून एक कागद काढून त्यात महिलेचे दागिने ठेवले. व त्या महिलेला बोलण्यात गुंतवत तिच्या हातात गुंडाळलेला कागद देऊन मोटरसायकवर निघून गेले. (Latest Marathi News)

Mumbai News
Maharashtra Politics: राजकारणातील सर्वात मोठी बातमी, उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीला; काय आहे कारण?

मात्र महिलेला शंका आल्याने तिने कागदाला दाबून बघितले असता त्यात दागिने नसल्याचे तिला जाणवले म्हणून महिलेने आरडाओरडा केल्याने लोक एकत्र जमले. त्या ठिकाणी गस्तीवर असलेली पोलीसांची गाडी तिथे पोहोचली. पोलिसांना पाहून दोन्ही तोतया पोलीस पळू लागले.शेख आणि दातीर यांनी पाठलाग करून त्या दोघांना ताब्यात घेतले. त्या दोघांकडून सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. फसवणूक करणारी ही आंबिवलीची टोळी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com