Petrol Diesel Price  Saam Tv
देश विदेश

Petrol Diesel Price Changes: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी इंधनाच्या दरात मोठा बदल; नवीनतम दर तपासा

Petrol Diesel Price News : जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

Shivani Tichkule

Petrol Diesel Rates : जागतिक बाजारात क्रूडच्या वाढत्या किमतीचा परिणाम देशांतर्गत किरकोळ बाजारातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरही दिसून येत आहे. ब्रेंट क्रूडची किंमत सतत प्रति बॅरल 85 डॉलरच्या वर आहे. सरकारी तेल कंपन्यांनी सोमवारी सकाळी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही बदल दिसून येत आहेत. आज बिहारमध्ये इंधन स्वस्त झाले आहे तर उत्तर प्रदेशात इंधनाचे दर वाढले आहे. (Latest Marathi News)

गौतम बुद्ध नगर (नोएडा) येथे पेट्रोल 11 पैशांनी महाग होऊन 96.76 रुपये प्रति लीटर झाले आहे. तर डिझेल (Diesel) 11 पैशांनी वाढून 89.93 रुपये प्रति लिटर झाले आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये आज पेट्रोल 15 पैशांनी महाग झाले असून ते 96.62 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. येथे डिझेल 11 पैशांनी वाढून 89.81 रुपये प्रति लिटर झाले आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे पेट्रोल (Petrol) 18 पैशांनी स्वस्त झाले असून ते 107.24 रुपये प्रतिलिटर झाले आहे. येथे डिझेल 17 पैशांनी घसरले असून 94.04 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

– दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

– चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

– कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये. डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

घरबसल्या जाणून घेऊ शकता पेट्रोल-डिझेलचे दर

तुम्ही आता घरबसल्या एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमधून RSP आणि आपल्या शहरातील कोड टाकून 9224992249 या क्रमांकावर मॅसेज पाठवावा लागेल.

BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. HPCL ग्राहक HPP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात. 

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ बदलाच्या हालचाली?

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ! दोन्ही राष्ट्रवादीची अचानक बैठक, कोअर कमिटीनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय?

Cabinet Reshuffle : राज्यातील ५ मंत्री बदलणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलांच्या हालचाली, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Kojagiri Purnima 2026: कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीच्या कृपेसाठी चुकवू नका ‘या’ गोष्टी

Soan Papdi Recipe: यंदा दिवाळीत घरी बनवा हलकी, खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारी सोनपापडी, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT