Pegasus case: पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी 'याचं' उत्तर दिलचं पाहिजे saamtv news
देश विदेश

Pegasus case: पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी 'याचं' उत्तर दिलचं पाहिजे

ही तर देशाच्या लोकशाहीची (Democracy) हत्याच आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली

आम्हाला लोकसभेत (Loksabha) बोलू दिले जात नाही. आम्ही काही विचारलं तर आमचा आवाज दाबला जातो. केंद्रसरकार (Central Government) लोकसभेत पिगासस स्पायवेअर फोन टॅपिंग मुद्द्यावर बोलू देत नाही की बोलायलाही तयार होत नाही. आता आम्हाला त्यांनी फक्त एकच सांगायच आहे की, केंद्रसरकारने पिगासस विकत घेतले की नाही, यासर्व प्रश्नांची उत्तरे केंद्रसरकारने द्यायची आहेत. अशा शब्दांत कॉंग्रेस खासदार राहूल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांनी केंद्रसरकारवर निशाणा साधला आहे. आज सकाळी राहूल गांधी यांच्या नेतृत्त्वात देशभरातील विरोधी पक्षनेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत केंद्रसरकारवर पिगासस प्रकरणी (Pegasus phone tapping case) हल्लाबोल केला. (Pegasus case: Rahul Gandhi demands answer from PM Modi)

''केंद्रसरकारने देशातील लोकांच्या विरोधात पिगाससचे हत्यार वापरले. असे करुन त्यांनी देशाच्या लोकशाहीची हत्या केली आहे. आता ते पिगाससवर बोलायला तयार नाही. पिगासस प्रकरणावर सभागृहात कोणतीही चर्चा होणार नाही, असे आम्हाला स्पष्टपणे सांगण्यात आल्याचे'' राहूल गांधी यांनी म्हटले आहे. ''केंद्रसरकारने माझ्याविरोधात, देशातील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, उद्योजक आदींच्या विरोधात पिगाससचे हत्यार वापरले, मग सदनात या विषयावर चर्चा का होत नाही,'' असा सवालही यावेळी राहूल गांधी यांनी विचारला आहे.

''केंद्रसरकारने दहशतवाद्यांच्या विरोधात, देशद्रोह्यांच्या विरोधात या हत्याराचा वापर करायचा होता. पण आपल्याच देशाच्या लोकशाही विरोधात असे हत्यार का वापरण्यात आले. जनतेने अशी काय चूक केली होती की केंद्रसरकारने देशाच्या जनतेच्या विरोधात असे हत्यार वापरले, '' या सर्व प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी द्यायची आहेत. अशा शब्दात राहूल गांधी यांनी केंद्रसरकारले ठणकावले आहे.

''संसदेत बोलले जाते आम्ही सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणत असल्याचा आरोप केला जातो. पण आम्ही प्रश्न विचारतो तर त्यावर उत्तर दिले जात नाही. आम्ही विरोधी पक्ष म्हणून आमची जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत. हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे आणि जिथे राष्ट्रीय सुरक्षेचा असतो त्याठिकाणी सरकारने उत्तर दिलेच पाहिजे, असेही राहूल गांधी यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, देशभरातील विरोधी पक्षनेत्यांनी केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आपली मुठ बांधायला सुरवात केल्याचे दिसत आहे. आज राहूल गांधी यांच्या नेतृत्त्वात झालेल्या बैठकील देशभरातील विरोधीपक्षनेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रसरकारला पिगासस प्रकरणावरुन घेरण्यासंबंधी रणणिती तयार करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शितल तेजवानीच्या इतर घरं, कार्यालय, आस्थापनांची पोलिस झडती घेण्याची शक्यता

Pune News: दिदी तुला वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा! पोलीस निरीक्षक नाईक निखिल रणदिवे बेपत्ता; व्हाट्सअप स्टेट्सन् खळबळ

धक्कादायक; महाप्रसाद खाल्ला अन्...; 100 ते 125 नागरिकांची प्रकृती बिघडली, घटनेनं खळबळ

AhilyaNagar Crime: लग्नासाठी सततचा त्रास,लॉजमध्ये नृत्यांगनाने घेतला गळफास; भाजपच्या माजी नगरसेवकाला ठोकल्या बेड्या

Mumbai Travel : 'ख्रिसमस'चा दिवस होईल खास, जोडीदारासोबत मुंबईतील 'या' ठिकाणी घालवा निवांत वेळ

SCROLL FOR NEXT