PATNA FATHER KILLS 12-YEAR-OLD SON AFTER DOMESTIC FIGHT IN MANER 
देश विदेश

Crime News: बायको माहेरी गेली, संतापलेल्या नवऱ्याने मुलाचा घेतला जीव, माणुसकीला काळिमा फासणारी घटना

Patna Crime News: मानेरच्या शेरपूर गावात कौटुंबिक वादातून वडिलांनी १२ वर्षीय मुलावर मारहाण केली. उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. पोलिसांनी चार नातेवाईकांना अटक केली.

Dhanshri Shintre

  • कौटुंबिक वादातून वडिलांनी अल्पवयीन मुलावर मारहाण केली.

  • मारहाणीमुळे १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला.

  • पत्नीने पतीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

  • चार जणांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी संतोष राय फरार आहे.

पाटणाजवळील मानेर परिसरातील शेरपूर गावात एका हृदयद्रावक घटनेने खळबळ माजली आहे. कौटुंबिक वादातून वडिलांनी अल्पवयीन मुलावर मारहाण केली. यामुळे मुलाचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेरपूर गावातील रहिवासी संतोष राय यांचा दोन दिवसांपूर्वी त्याच्या बायकोसोबत वाद झाला होता. त्यानंतर रागाच्या भरात संतोष रायची बायको प्रेमा देवी ही आपल्या माहेरी गौरैया स्थान येथे निघून गेली.

नवरा संतोष राय हा आपल्या १२ वर्षाच्या प्रिन्स नावाच्या मुलावर राग काढत त्याला बेदम मारहाण केली. गंभीर अवस्थेत असलेल्या मुलाचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रिन्सच्या मृत्यूचा तपशील लपवण्यासाठी संतोष राय आणि त्यांच्या नातेवाईकांनी तत्काळ अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, प्रेमा देवी हिला मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच ती थेट आपल्या सासरी धाव घेऊन गेली आणि तिने नवऱ्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला. मानेर पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत अंत्यसंस्कार करणारे चार जण होते. सिंग राय, ओम प्रकाश, श्याम बाबू आणि राम बाबू अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सखोल चौकशी सुरू असून, संतोष राय अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. शहराचे एसपी पश्चिम भानू प्रताप यांनी सांगितले की, प्रेमा देवी यांच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे. या घटनेमुळे पाटणामधील शेरपूर गावात खळबळ माजली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Winners List : बिग बॉस सीझन 1 ते 19; कोण कोण ठरलं BB ट्रॉफीचे मानकरी? पाहा विजेत्यांची यादी

Bigg Boss 19 Winner Gaurav Khanna : पहिल्या नजरेत प्रेम! ९ वर्षांचा संसार; फिल्मी स्टाइल प्रपोज, वाचा गौरव खन्नाची प्यारवाली लव्हस्टोरी

Bigg Boss 19 Winner: गौरव खन्नाने उचलली 'बिग बॉस 19'ची ट्रॉफी; फरहाना भट्टला दिली मात

Bigg Boss 19 - Pranit More : 'बिग बॉस १९' चे घर गाजवणाऱ्या महाराष्ट्रीयन भाऊची संपत्ती किती?

Pranit More Struggle Journey : दादरची चाळ ते बिग बॉसचे घर कसा होता प्रणित मोरेचा संघर्षमय प्रवास? वाचा महाराष्ट्रीयन भाऊची कहाणी

SCROLL FOR NEXT