Patna Opposition Unity Meeting Saam Tv
देश विदेश

Patna Opposition Unity Meeting: 'आमच्यात थोडे मतभेद आहेत, पण..' विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर राहुल गांधींचं मोठं वक्तव्य

Patna Opposition Meeting News Updates: आज देशातील 17 विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक पाटण्यात पार पडली

Satish Kengar

Patna Opposition Meeting News Today: ''आमच्यात थोडे मतभेद आहेत, पण आम्ही एकत्र लढणार'', असं काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gnadhi) म्हणाले आहेत. आज देशातील 17 विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक पाटण्यात पार पडली. यामध्ये यामध्ये राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal), भगवंत मान, एमके स्टॅलिन यांच्यासह सहा राज्यांचे मुख्यमंत्री आणि अखिलेश यादव, मेहबुबा मुफ्ती यांच्यासह पाच राज्यांचे माजी मुख्यमंत्री सहभागी झाले होते.

या बैठकीला राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेही उपस्थित होते. या बैठकीत 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्तेवरून पायउतार करण्यासाठी रणनीतीवर चर्चा झाली. याच बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी असं म्हणाले आहेत.

राहुल गांधी म्हणाले आहेत की, ''आम्ही एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या विचारधारेच्या रक्षणासाठी आम्ही योग्य ती पावले उचलू. पुढील बैठकीत आज घडलेल्या गोष्टींचा अधिक सखोल विचार केला जाईल.''

विरोधी पक्षनेत्यांची दुसरी बैठक पुढील महिन्यात शिमल्यात होणार

या पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, ''लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सर्व नेते एकत्रितपणे एक समान अजेंडा तयार करत आहेत. 10-12 जुलै रोजी शिमल्यात आणखी एक बैठक होणार आहे. तिथे बसून अजेंडा तयार केला जाईल. प्रत्येक राज्यात कोणकोणत्या गोष्टी ठरवता येतील, कसे काम करायचे, यावर चर्चा झाली आहे. प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र रणनीती तयार करण्यात येणार असल्याचे खरगे यांनी सांगितले. (Latest Marathi News)

आम्हाला विरोध म्हणणे योग्य नाही: ममता बॅनर्जी

पाटणा येथील बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ''आम्ही सर्व पक्ष एक आहोत. मीच नितीशजींना पाटणा येथे बैठक घेण्याचा प्रस्ताव दिला होता. कारण पाटण्यापासून सुरू होणारे आंदोलन मोठे रूप धारण करते. आम्हाला विरोध म्हणणे योग्य नाही, असेही ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT