Accident News Saam
देश विदेश

भरधाव कारची ट्रकला धडक; पाच बिझनेसमॅनचा जागीच मृत्यू, रात्री भीषण अपघाताचा थरार

Accident News: पाटणा-गया-डोभी रस्त्यावर कार-ट्रक भीषण अपघात. अपघातात पाच व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला. कारचा अक्षरशः चक्काचूर, सर्व मृतदेह कारमध्ये अडकले.

Bhagyashree Kamble

  • पाटणा-गया-डोभी रस्त्यावर कार-ट्रक भीषण अपघात.

  • अपघातात पाच व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला.

  • कारचा अक्षरशः चक्काचूर, सर्व मृतदेह कारमध्ये अडकले.

  • पोलिसांनी कटरने कार कापून मृतदेह बाहेर काढले आणि तपास सुरू केला.

बिहारमधील पाटणा येथून भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. पाटणा गया डोभी या चार पदरी रस्त्यावर भीषण अपघात घडला. भरधाव कारने ट्रकला भयंकर धडक दिली. या भीषण रस्ता अपघातात पाच तरूणांचा मृत्यू झाला. हे सर्वजण व्यापारी असल्याची माहिती आहे. या भयंकर दुर्घटनेत कारचा चक्काचुर झाला. या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा परसा बाजार पोलीस स्टेशन परिसरातील सुईथा वळणाजवळ हा भीषण रस्ता अपघात घडला.

मृतांची ओळख

राजेश कुमार

सुनील कुमार

कमल किशोर

प्रकाश चौरसिया

संजय कुमार

सर्व मृत हे पाटण्याच्या कुर्जी आणि पटेल नगर भागातील रहिवासी असल्याची माहिती आहे. ही कार संजय कुमार सिन्हा यांची असल्याची माहिती समो आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सर्व व्यापारी फतुहाहून पाटणा येथे परतत असताना ही धक्कादायक घटना घडली आहे.

घटनेच्या रात्री चालकाने कारचा वेग जास्त ठेवला होता. यामुळे कार थेट ट्रकला जाऊन धडकली. टक्कर इतकी जोरदार होती की, कारचा चक्काचूर झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व व्यापारी कीटकनाशके आणि शेतीशी संबंधित उत्पादनांचा व्यवसाय करत होते.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक तसेच पोलिसांनी धाव घेतली. सर्व मृतदेह गाडीत अडकले होते. पोलिसांनी कटरने कार कापली. नंतर मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेत रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. सर्व मृतांच्या नातेवाईकांना धक्का बसला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT