Train Accident: Saam Tv
देश विदेश

Trains Collided In Bangladesh: बांगलादेशात मालगाडी अन् प्रवाशी रेल्वेचा अपघात; १५ जणांचा मृत्यू

Train Accident: किशोरगंजजवळ दोन रेल्वेचा अपघात झालाय. यात १५ जणांचा मृत्यू झालाय.

Bharat Jadhav

बांगलादेशाच्या राजधानी जवळ दोन रेल्वेची धडक होऊन अपघात झालाय. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी किशोरगंजच्या भैरब उपजिल्ह्यात एक प्रवाशी रेल्वेला मालगाडीने मागून धडक दिल्याने हा अपघात झालाय. (Latest News)

एएफपीच्या वृत्तानुसार, हा अपघात वेस्टर्न सिटी भैरबमध्ये झाल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलंय. आम्ही १५ जणांचा मृत्यू झालाय. प्रशासकीय अधिकारी असलेल्या सदीकौर रहमान यांनी ही माहिती दिली. ढाकापासून भैरब हे ६० किलोमीटर अंतरावर असून त्या ठिकाणी हा अपघात झाला. यात अपघातात १०० जण जखमी झालेत. रेल्वेचा अपघात दुपारी ४ वाजता झाला. एकाच रेल्वेरुळावर दोन्ही रेल्वे आल्याने हा अपघात झाल्याची माहिती रहमान यांनी दिलीय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या भीषण अपघातानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. स्थानिक पोलीस अधिकारी सिराजुल इस्लाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या वाढू शकते. तर बांगलादेशी टीव्ही चॅनेलनुसार, या रेल्वे अपघातातील मृतांची संख्या २० वर पोहोचलीय. भैरब रेल्वे पोलीस स्टेशनचे प्रभारी मोहम्मद अलीम हुसैन शिकदार यांनी सांगितले की,पॅसेंजर ट्रेन ढाकाकडे जात होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

SCROLL FOR NEXT