Accident news  Saam Tv
देश विदेश

Jammu Kashmir Accident News : जम्मू-काश्मीरमध्ये टॅक्सी दरीत कोसळली, 10 जणांचा मृत्यू

Accident News : जम्मूहून श्रीनगरला जाणारी प्रवासी टॅक्सी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर रामबनजवळ खोल दरीत कोसळली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

प्रविण वाकचौरे

Jammu Kashmir Accident News :

जम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. जम्मूहून श्रीनगरला जाणारी प्रवासी टॅक्सी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर रामबनजवळ खोल दरीत कोसळली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

पोलीस, एसडीआरएफ आणि इतर रेस्क्यू टीम रामबन घटनास्थळी पोहोचले आहेत आणि बचाव कार्य सुरु आहे. मात्र पावसामुळे बचावकार्यात व्यत्यय येत आहे. अपघाताचं कारण अद्याप समजू शकलेली नाहीत. पोलीस घटनेची अधिक माहिती घेत आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी भरलेली एक टॅक्सी श्रीनगरहून जम्मू येथे निघाली होती. मध्यरात्री 1.15 च्या सुमारास या टॅक्सीला अपघात झाला. बॅटरी चष्माजवळ ही टॅक्सी ३०० फूट खोल दरीत कोसळली.

घटनेची माहिती मिळताच काही वेळातच पोलीस बचाव पथकासह घटनास्थळी दाखल झाले. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत १० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेत कार चालकाचा देखील मृत्यू झाल्याचं कळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुलुंड पोलिसांची मोठी कारवाई! केबल चोरी करणारी आंतरराज्य टोळीला ठोकल्या बेड्या

Congress MP: राजीनामा देण्याच्या २४ तासाच्या आत काँग्रेस खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश; राज्यातील राजकारणात खळबळ

Maharashtra Politics: महायुतीत अंतर्गत कलह! भाजपने केसानं गळा कापला, शिंदेसेनेच्या आमदाराचा आरोप

Homemade Skin Tan Removal Tips: उन्हामुळे त्वचा काळी पडलीये? पार्लरला जाण्यापूर्वी 'हे' ५ घरगुती उपाय करा; चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो

Face Care: उन्हामुळे त्वचेची डल पडली आहे? घरी तयार केलेला हा फेस स्क्रब आठवड्यातून ३ वेळा नक्की वापरा

SCROLL FOR NEXT