Somalia Plane Crash  Saam tv
देश विदेश

दुर्घटनांची मालिका सुरूच; टेकऑफनंतर १५ मिनिटांत विमान समुद्रात कोसळलं

Somalia Plane Crash : जगात विमान दुर्घटनांची मालिका सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. टेकऑफनंतर १५ मिनिटांत विमान समुद्रात कोसळल्याची घटना घडली.

Vishal Gangurde

सोमालियात टेकऑफनंतर विमान समुद्रात कोसळल्याची घटना घडली

अपघातग्रस्त विमानात ५० प्रवासी आणि ५ क्रू मेंबर होते

तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळल्याची दुर्घटना घडल्याची शक्यता

सोमालियाची राजधानी मोगदिशूमध्ये प्रवाशांचं विमान टेकऑफनंतर काही मिनिटांत समुद्रात कोसळल्याची घटना घडली आहे. मएडन आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली. प्रवाशांचं विमान हे मोदादिशून येथून गुरिएल शहारात निघालं होतं. विमानात ५० प्रवासी आणि ५ क्रू मेंबर होते. या दुर्घटनेत कोणाचाही मृत्यू झालेला नाही.

उड्डाण घेतल्यानंतर १५ मिनिटांत विमानात तांत्रिक बिघाड झाला. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने पुन्हा विमानतळावर जाण्याचा निर्णय घेतला. परंतु त्याला पूर्णपणे विमानावर नियंत्रण मिळवता आलेलं नाही. ५० प्रवाशांनी भरेललं विमान समुद्राच्या किनाऱ्यावर कोसळलं. विमान कोसळल्यानंतर किनाऱ्याजवळ एकच धावाधाव झाली.

व्हायरल व्हिडिओमध्ये विमान जमिनीवर कोसळल्याचं पाहायला मिळालं. विमान जमिनीवर कोसळल्यानंतर प्रवासी घाईघाईने बाहेर आले. घटनास्थळी सुरक्षा कर्मचारी आणि स्थानिक घटनास्थळी पोहोचले होते. दुर्घटनेनंतर विमानाचा एक दरवाजा उघडलेला पाहायला मिळाला. विमान हे स्टार्स्की एअरलाइन्सचे होतं. ही विमान कंपनी सोमालियाच्या प्रमुख एअरलाइन्समध्ये समावेश आहे.

सोमाली सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीचे डायरेक्टर अहमद मुअल्लिम हसन यांनी सांगितलं होतं की, विमानात एकूण ५५ जण होते. त्यात ५० प्रवाशांचा समावेश आहे. तर ५ क्रू मेंबरचा समावेश होते.

दुर्घटनेनंतर विमानतळ बंद

विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'विमानाला आग लागण्याची भीती होती. समुद्राजवळ विमान कोसळल्यानंतर बचाव कार्य सुरू केलं होतं. या दुर्घटनेनंतर विमानतळ बंद करण्यात आलं. विमानतळ प्रशासनाने दुर्घटना कशी झाली, याचा तपास सुरू केला आहे.

विमान दुर्घटना कुठे घडली?

सोमालियाची राजधानी मोगदिशूमधील मएडन आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ दुर्घटना घडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश भाऊंनी वीकेंडला मारली बाजी; 'राजा शिवाजी'ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम, आतापर्यंत किती कोटींची कमाई?

Maharashtra News Live Update: मुंबईच्या काही भागात मान्सून पूर्व पाऊस

मोठी बातमी! एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत दाखल, अमित शाहांची तातडीने भेटणार, राज्यात नेमकं काय सुरू?

डेटिंग अ‍ॅपवर मैत्रीच्या जाळ्यात अडकला, गुंतवणुकीच्या आमिषाने 7 कोटी रुपये गमावून बसला

Diabetes Symptoms On Face: डायबिटीज झाल्यास चेहऱ्यावर दिसतात ही लक्षणे, वेळीच ओळखा नाहीतर...

SCROLL FOR NEXT