Mamata Banerjee  Saam Tv
देश विदेश

West Bengal Results : पश्चिम बंगालचा निकाल बदलणार, ममता बॅनर्जींच्या दाव्याने राजकारणात खळबळ

Mamata Banerjee reaction BJP Lead : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजप १९३ जागांवर आघाडीवर, तर ममता बॅनर्जी यांनी मतमोजणी प्रक्रियेवर गंभीर आरोप केले.

Namdeo Kumbhar

West Bengal Assembly Election results live : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला न भूतो न भविष्यति असे यश मिळाले आहे. मतमोजणीच्या सुरूवातीच्या कलांमध्ये भाजपने १९३ जागांवर आघाडी घेतली आहे. २९४ जागांपैकी भाजपने १९३ जागांवर आघाडी घेत सत्तास्थापनेकडे वाटचाल केली आहेच. भाजपने ममता बॅनर्जी यांनी मागील १५ वर्षातील सत्ता उलथवून लावल्याचे चित्र आहे. पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हार मानली नाही. त्यांनी टीएमसीच्या कार्यकर्त्यांना विजय आपलाच असेल, असा विश्वास दिलाय. कुणीही मतदान केंद्र सोडू नका, असे आवाहनही ममता बॅनर्जी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलेय. सुरुवातीच्या कलांमध्ये ममता बॅनर्जी यांचा पक्ष फक्त ९६ जागांवरच आघाडीवर आहे.

कुणीही निराश होऊ नका अथवा घाबरू नका. सध्या फक्त २ ते ४ फेऱ्यांची मोजणी झाली आहे, अजून १४ ते १८ फेऱ्या बाकी आहेत. संध्याकाळी सूर्यास्तानंतर विजय आपलाच असेल, याची मला पूर्ण खात्री आहे, असा विश्वास ममता भॅनर्जी यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मतमोजणीवेळी होणाऱ्या गोंधळावरही भाष्य केलेय. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यामध्ये त्या म्हणाल्या, मतमोजणी केंद्रामध्ये असलेले आमचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत केंद्र सोडून बाहेर पडू नये. सुरुवातीला भाजपला आघाडीवर दाखवणे ही त्यांचा प्लान आहे. याबद्दल मी कालच इशारा दिला होता. भाजपने अनेक ठिकाणी जाणीवपूर्वक मतमोजणी थांबवली आहे. कल्याणीसारख्या ठिकाणी तर मशिनमध्ये घोळ आढळला आहे.

निवडणूक आयोग पूर्णपणे मनमानी करत आहे. केंद्रीय तपास पथके आणि पोलिसांच्या मदतीने टीएमसीच्या लोकांवर अत्याचार केले जात आहेत. 'एसआयआर' (SIR) च्या माध्यमातून मते चोरण्याचा प्रयत्न झाला आहे. आम्ही प्रत्यक्षात १०० पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहोत, पण ती बातमी दाखवली जात नाहीये. सगळीकडे चुकीची माहिती पसरवली जात आहे, असा अरोपही ममता बॅनर्जी यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : अक्कलकोट–गाणगापूर महामार्गावर भीषण अपघात! डंपरच्या जोरदार धडकेत एसटी बसचा चक्काचूर; दोघांचा जागीच मृत्यू

पश्चिम बंगाल जिंकणाऱ्या भाजपचा २ राज्यात दारूण पराभव, दोन आकडी संख्या गाठणेही कठीण

Baramati rahuri bypolls election results: सुनेत्रा पवार यांचा विजयानंतर जय पवार दादांच्या स्मृतिस्थळावर

Thalapathy Vijay Net Worth : तामिळनाडूच्या राजकारणात उलथापालथ करणाऱ्या थलापती विजय यांची संपत्ती किती?

Election Result Live : पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला ०० जागा

SCROLL FOR NEXT