Kolhapur crime : कोल्हापुरात घरात घुसून डॉक्टर महिलेवर बलात्कार; व्हिडीओ काढला अन्...

Kolhapur crime news today : कोल्हापुरात डॉक्टर महिलेवर अत्याचार करून व्हिडिओच्या माध्यमातून खंडणी मागणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या धक्कादायक प्रकरणामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Kolhapur crime news today
Kolhapur crime news todaySaam TV
Published On

रणजीत माजगावकर, कोल्हापूर प्रतिनिधी

Kolhapur doctor assault case accused arrested : पतीला भेटण्याच्या बहाण्याने घरात घुसलेल्या ओळखीतील तरुणाने डॉक्टर महिलेवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. नराधम तरूण इतक्यावरच थांबला नाही तर बळजबरीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर पाठविला. सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल करण्याची भीती घालून एक लाख रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी पीडित महिलेने राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संशयित आरोपी शक्ती विक्रम भोसले याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

'व्हिडिओ काढले अन्...

आरोपी शक्ती विक्रम भोसले (वय २८, रा. शाहूपुरी, कोल्हापूर) याला न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित महिला ३० एप्रिलला दुपारी तीन वाजता घरात एकटीच होती. त्यावेळी शक्ती भोसले येथे आला. त्यानंतर घटनाक्रम घडला. या प्रकाराने धक्का बसलेल्या पीडिताने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांचे तोंड दाबून धरत त्याने वाच्यता केल्यास पतीसह पीडिताला ठार मारण्याची धमकी दिली. मानसिक धक्का बसलेली महिला दोन दिवस घरातून बाहेरही पडली नाही.

Kolhapur crime news today
Tamil Nadu Election Results: मोठी उलथापालथ! थलापति विजय मुख्यमंत्री होणार? तामिळनाडूत सर्वात मोठा उलटफेर

ब्लॅकमेल केले..

धक्कादायक म्हणजे, बलात्कार केल्यानंतर आरोपी शक्ती भोसलेने एक मे रोजी रात्री ११ वाजता पीडित महिलेच्या मोबाईलवर व्हिडिओ टाकला. शक्तीने फोन करून हा व्हिडिओ डिलीट करण्यासाठी एक लाखाची मागणी केली. त्यानंतर शनिवारी (ता. २) पीडिताने याबाबत राजारामपुरी पोलिस फिर्याद दिली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

Kolhapur crime news today
विदर्भ हादरला! नायब तहसीलदाराची आत्महत्या, राहत्या फ्लॅटमध्ये घेतला गळफास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com