Opposition MPs protest in Lok Sabha as G Ram G Bill is passed amid chaos during Winter Session. saam tv
देश विदेश

Parliament Winter Session: लोकसभेत गोंधळात 'G Ram G' विधेयक मंजूर, विरोधकांनी फाडल्या विधेयकाच्या प्रती

G Ram G Bill Passed In Lok Sabha: लोकसभेत 'जी राम जी' विधेयक मंजूर झाले. विरोधी पक्षाच्या खासदारांनी विधेयकाच्या प्रती फाडत या विधेयकाचा विरोध केला. त्यानंतर सभापती ओम बिर्ला संतापले.

Bharat Jadhav

  • हिवाळी अधिवेशनात लोकसभेत ‘जी राम जी’ विधेयक मंजूर.

  • विरोधकांच्या तीव्र गदारोळात आणि घोषणाबाजीत मतदान.

  • विरोधी खासदारांनी विधेयकाच्या प्रती फाडून निषेध.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज लोकसभेत रामजी विधेयकावरून गोंधळ घडाला. विरोधकांच्या गदारोळात हे विधेयक मंजूर करण्यात आले. विरोधकांनी विधेयकाच्या प्रती फाडल्या. मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा) च्या जागी जी राम जी विधेयक आज लोकसभेत मंजूर झाले. विधेयक मांडले जात असताना सभागृहात प्रचंड गदारोळ झाला.

विरोधी पक्षाच्या खासदारांनी विधेयकाच्या प्रती भरसभागृहात फाडल्या. हे विधेयक स्थायी समितीकडे पाठवावे, अशी मागणी करणाऱ्या विरोधी सदस्यांनी सभागृहाच्या वेलीत विरोध करण्यास सुरुवात केली. विधेयकावर सविस्तर चर्चा झाली असल्याचं सभापतींनी सांगितल्यानंतर विरोधकांनी विधेयकाच्या प्रती फाडल्या. या कृत्यावर लोकसभेच्या अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केले. जनतेने तुम्हाला कागदपत्रे फाडण्यासाठी आणि फेकण्यासाठी संसदेत पाठवले नाही, असं म्हणत ओम बिर्ला यांनी संताप व्यक्त केला.

दरम्यान लोकसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर आता राज्यसभेत मांडले जाणार आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा, द्रमुकचे टीआर बालू आणि समाजवादी पक्षाचे धर्मेंद्र यादव यांच्यासह अनेक विरोधी सदस्यांनी या विधेयकाचा तीव्र विरोध केला. कायद्यातून महात्मा गांधींचे नाव काढून टाकणे हा राष्ट्रपिताचा अपमान आहे. या विधेयकामुळे राज्यांवर मोठा भार पडेल असेही विरोधी पक्षाच्या खासदारांनी निदर्शनास आणून दिले. या विधेयकाच्या बाजूने युक्तिवाद करताना केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, काँग्रेसने फक्त नेहरूंच्या नावाने कायदे केलेत. आता ते एनडीए सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

त्यावर प्रियांका गांधी वाड्रा म्हणाल्या की, सरकारला नावे बदलण्याचं "वेड" लागलंय. प्रियांका गांधी यांच्या टिप्पणीचं खंडन करताना कृषमंत्री चौहान म्हणाले की, विरोधी पक्षाला नावे बदलण्याचं वेड आहे, तर नरेंद्र मोदी सरकार त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. मनरेगा हे केवळ भ्रष्टाचाराचे साधन बनले होते. कायदा जाणकारांशी सल्लामसलत केल्यानंतर हा नवीन कायदा आणण्यात आल्याचं शिवराजसिंह चौहान म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

https://saamtv.quintype.com/story/d86ac51e-b354-4ca2-8d75-93946c83e994

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

SCROLL FOR NEXT