Rahul Gandhi Slams Government Over Paper Leak Saam Tv
देश विदेश

Rahul Gandhi: 'विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त...'; पेपर लीकप्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

Rahul Gandhi Slams Government Over Paper Leak: लोकसभेमध्ये राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांच्या इडियट आणि अंधभक्त या शब्दांवरून लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ

Priya More
  • लोकसभेमध्ये राहुल गांधी पुन्हा आक्रमक

  • नीट पेपरफुटी प्रकरण, आंदोलनावरून सरकारला खडेबोल सुनावले

  • परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान सरकारवर पेपर लीक आणि शिक्षण व्यवस्थेवरून हल्लाबोल

  • इडियट आणि अंधभक्त या शब्दांवरून लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज लोकसभेमध्ये सुरू असलेल्या परीक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेत भाग घेतला. त्यांनी यावेळी नीट पेपरफुटी प्रकरणी, विद्यार्थी आंदोलन यावरून मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले. लोकसभेत बोलताना राहुल गांधी यांनी एका विद्यार्थिनीसोबतच्या संभाषणाचा संदर्भ देत विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त या ३ कॅटेगरीचे वर्णन केले. राहुल गांधींच्या या भाषणानंतर सभागृहामध्ये सत्ताधारी आक्रमक झाले.

राहुल गांधी यांनी सांगितले की, 'मी विचार केला की यात इडियट (मूर्ख) सुद्धा आहेत आणि विद्यार्थी सुद्धा आहेत. मी विचारले की ही तिसरी कॅटेगरी कुठे जाते? तर ती म्हणजे अंधभक्त. अशा तीन कॅटेगरी आहेत. जे विद्यार्थी आहेत ते शिक्षण व्यवस्थेबद्दल बोलत आहेत. ते दररोज ८ ते १० तास अभ्यास करतात. शिक्षण खूप महाग झाले आहे आणि ते वर्षानुवर्षे मेहनत करतात. '

राहुल गांधी विद्यार्थी आंदोलनावर करण्यात आलेल्या लाठीचार्जवरून चांगलेच संतापले. ते म्हणाले की, 'संपूर्ण देशाला विद्यार्थ्यांच्या भावना समजतात. भाजपने या विधेयकावर आपल्या विद्यार्थ्यांची संमती घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांची आंदोलने राग आणि द्वेषातून प्रेरित नव्हती. देशातील तरुणांना रस्त्यावर उतरणे भाग होते. संपूर्ण देशाला विद्यार्थ्यांच्या भावना समजल्या होत्या. महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांचा संताप रास्त होता.'

राहुल गांधींच्या या विधानावर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी जोरदार गदारोळ केला आणि तीव्र आक्षेप घेतला. राहुल गांधी असंसदीय शब्द वापरत आहेत. ते एका विद्यार्थिनीच्या उदाहरणाचा संदर्भ देत असा शब्द बोलत आहेत. हा शब्द कामकाजातून काढून टाकला पाहिजे. यावर लोकसभा अध्यक्षांनी सांगितले की, 'जे शब्द असंसदीय असतील, ते कामकाजातून काढून टाकले जातील.'

राहुल गांधी पुढे म्हणाले, 'मी इडियट या शब्दाऐवजी दुसरा शब्द वापरतो.' त्यावर अध्यक्षांनी स्पष्ट केले की, 'तुम्हाला यावर निर्णय देण्याची गरज नाही, मी यावर निर्णय दिला आहे.' त्यानंतर राहुल गांधी पुढे म्हणाले, 'विद्यार्थी सजग आहेत आणि त्यांना सत्य ठाऊक आहे. एका परीक्षेवर शिक्षण बजेटपेक्षा जास्त खर्च होतो, तर अंधभक्त मूर्खालाच देव मानतात.'

लोकसभेत परीक्षा विधेयकावर चर्चा सुरू असताना राहुल गांधींच्या भाषणावेळी गदारोळ झाला. इडियट शब्दावरून सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला होता. त्यानंतर राहुल गांधी यांनी भाषण थांबवले होते. त्यानंतर काहीवेळानंतर लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधींना भाषण सुरू ठेवण्यास सांगितले. अध्यक्ष म्हणाले, जर तुम्हाला बोलायचे नसेल, तर मी पुढच्या वक्त्याला बोलावू? याच सभागृहात विरोधी पक्षाने सभागृह नेत्यांना न बोलू दिल्याचे प्रसंग आम्ही आधीही पाहिले आहेत.

केंद्रीय मंत्री किरेन रिजेजू म्हणाले, सभागृहात चांगली चर्चा सुरू आहे, तुम्ही असा गोंधळ निर्माण करू नका. विरोधी पक्षाने यापूर्वी अनेकदा पंतप्रधानांना बोलू दिलेले नाही. आज तुम्ही असंसदीय भाषेचा वापर केला असून तुमच्या शब्दावर आमचा आक्षेप आहे. भावनिक चेहरा दाखवून तुम्ही देशवासीयांची दिशाभूल करू शकत नाही.

यावर राहुल गांधी म्हणाले, 'मी इडियट हा शब्द कोणा एका व्यक्तीसाठी वापरलेला नाही, तर फक्त एक वर्ग/कॅटेगरी सांगितली आहे. जर तुम्हा सर्वांना असे वाटत असेल की सभागृहात फक्त भाजपनेच बोलावे, तर मी गप्प बसतो आणि खाली बसतो. मला काहीच अडचण नाही. मी जेव्हा जेव्हा बोलायला उभा राहतो तेव्हा रिजेजूजी मध्येच उभे राहतात आणि अध्यक्ष त्यांना संधी देतात.

लोकसभा अध्यक्ष म्हणाले, 'सभागृहात नेहमीच चांगल्या परंपरा आणि मर्यादा राहिल्या आहेत. आपण सर्वांनी या मर्यादा जपल्या पाहिजेत. जो नेता तर्काने आणि मर्यादेत राहून बोलतो, देश त्याचे ऐकतो आणि आदर करतो. त्यामुळे शब्दांची निवड ही संसदीय मर्यादेला धरूनच असावी.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

National Film Awards : ७२ वर्षांचा इतिहास बदलला; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये होणार

Tuesday Horoscope: कामाच्या ठिकाणी ताण वाढेल, ७ राशींचा खर्च कमी होणार; वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT