PM Modi Speech in Parliament Special Session 2023 SAAM TV
देश विदेश

PM Modi Speech : रडगाणं गायला खूप वेळ आहे; PM मोदींचा विरोधकांना चिमटा

PM Modi Speech in Parliament Special Session : संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना टोला लगावला.

Nandkumar Joshi

Parliament Special Session 2023 :

संसदेच्या विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कामकाज सुरू होण्याआधी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांना जोरदार चिमटा काढला.

या अधिवेशनाचा कालावधी खूप कमी आहे. मात्र, तो वेळेचा विचार केला तर खूप मोठा आहे. हे ऐतिहासिक निर्णयांचे अधिवेशन आहे. अधिकाधिक वेळ कामकाजासाठी मिळावा. रडगाणं गायला खूप वेळ मिळतो. रडगाणं गात राहा, असा उपरोधिक टोला मोदींनी विरोधकांना लगावला. (Latest Marathi News)

'संसदेचे विशेष अधिवेशन ऐतिहासिक असेल'

'आज देश आत्मविश्वासानं भारलेला आहे. त्याचवेळी संसदेचे हे विशेष अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाचा कालावधी कमी आहे. मात्र वेळेच्या हिशेबाने खूप मोठा आहे. ऐतिहासिक निर्णयांचे हे अधिवेशन असेल,' असे PM मोदी म्हणाले. २०४७ मध्ये या देशाला विकसित देश करण्याचा संकल्पही मोदी यांनी यावेळी सोडला.

रडण्यासाठी खूप वेळ आहे...

अधिवेशनाचा कालावधी खूप कमी आहे. अधिकाधिक वेळ कामकाजासाठी मिळावा, असं आवाहन मी सर्व आदरणीय खासदारांना करतो. रडगाणे गायला खूप वेळ असतो. ते करत राहा. जुन्या वाईट गोष्टी सोडून चांगल्यात चांगल्या गोष्टी घेऊन आपण नवीन संसद भवनात प्रवेश करणार आहोत, अशी मी आशा बाळगतो, असंही मोदी म्हणाले. (Parliament Special Session)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

SCROLL FOR NEXT