Parliament smoke attack in Delhi Saam Tv
देश विदेश

Parliament Candle Attack: काँग्रेस नेत्याने संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न केला उपस्थित, लोकसभा अध्यक्षांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक

Parliament smoke attack in Delhi: आजच्याच दिवशी 13 डिसेंबर 2001 रोजी संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी लोकसभेत झालेल्या सुरक्षेतील त्रुटींमुळे अनेक मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत.

Satish Kengar

Two People Jump Inside Lok Sabha Chamber:

आजच्याच दिवशी 13 डिसेंबर 2001 रोजी संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी लोकसभेत झालेल्या सुरक्षेतील त्रुटींमुळे अनेक मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. आज लोकसभेत दोन लोकांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारली.

त्यानंतर सभागृहाचे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर कामकाज पुन्हा सुरू झाले आणि सभापती ओम बिर्ला यांनी या घडामोडीवर भाष्य केले. या विषयावर चर्चा करण्यासाठी त्यांनी सर्वपक्षीय बैठकही बोलावली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

झिरो अवर दरम्यान घडलेल्या या घटनेची सविस्तर चौकशी सुरू करण्यात आल्याचे लोकसभा अध्यक्षांनी सांगितले. दिल्ली पोलिसांनाही आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. डब्यातून फक्त धूर येत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून, काळजी करण्याची गरज नाही. ही घटना घडवून आणणाऱ्या दोघांनाही पकडण्यात आले असून त्यांच्याकडील मालही जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. संसदेबाहेरूनही दोघांना अटक करण्यात आली आहे.  (Latest Marathi News)

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, आज घडलेली घटना आपल्या सर्वांसाठी चिंतेची बाब असून ही घटना अत्यंत गंभीर आहे. याची उच्चस्तरीय चौकशी सुरू असून त्यानुसार कारवाई केली जाईल. सभागृहातील सुरक्षेबाबतही सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे त्यांनी सभागृहाचे कामकाज गुरुवारी सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब केले.

सुरक्षा अधिकारी काय करत होते : अधीर रंजन

या घटनेबाबत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेत म्हणाले की, संसदेवर झालेल्या हल्ल्यात ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या शूर जवानांना आजच आम्ही आदरांजली वाहिली होती आणि आज सभागृहात दुसरा हल्ला झाला. त्यांनी विचारले की, सर्व खासदारांनी न घाबरता त्या दोघांना पकडले होते. पण मला जाणून घ्यायचे आहे की, हे सर्व घडले तेव्हा सुरक्षा अधिकारी काय करत होते?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

Personality Test: पहिली मुलगी दिसली की कवटी? तुमचं उत्तर उलगडणार तुमच्या पर्सनॅलिटीचं रहस्य

Railway Jobs: १०वी, १२ वी पास तरुणांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

...तर वडिलांच्या मालमत्तेवर मुलीचा हक्क नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT