lok sabha Parliament Security Breach Reason Saam TV
देश विदेश

Parliament Security Breach: संसदेत घुसखोरी करणाऱ्या सागरचा कुटुंबासोबत VIDEO कॉलवर संवाद; म्हणाला, आई मी जे केलं ते...

Sagar Sharma Video Call: आई-वडील यांच्यासह त्याच्या बहिणीची देखील चौकशी केली. याआधी यूपी एटीएसने सागरच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली, अशी माहिती संवादावेळी सागरला मिळाली.

Ruchika Jadhav

Parliament Security Breach:

संसद सुरक्षा भंग प्रकरणी आरोपी सागर शर्मा सध्या पोलिसांच्या अटकेत आहे. काल दिल्लीहून आलेल्या स्पेशल सेल टीमने सागरचं त्याच्या कुटुंबियांशी बोलणं करून दिलं. सागरने व्हिडीओ कॉलवर त्याच्या आईसोबत सुमारे ४० मिनिटे संवाद साधला. यावेळी त्याने आपण जे काही केलं ते योग्य असल्याचं म्हटलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिल्लीतील स्पेशल सेल टीमने सागरच्या खोलीतून काही कागदपत्रे जप्त केलीत. यामध्ये ४ बँक खात्यांचे पासबूक सापडलेत. या खात्यांमध्ये कधी पैसे आले कधी गेले अशा सर्व ट्रांजेक्शनबाबत माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. कुटुंबासोबत संवाद सुरू असताना सागरने यावर बातचीत केली.

पोलिसांनी सागरच्या वडिलांची स्वक्षरी घेतल्यानंतर डायरी, पुस्तके आणि काही फाइल्स जप्त केल्यात. तसेच आई-वडील यांच्यासह त्याच्या बहिणीची देखील चौकशी केलीये. याआधी यूपी एटीएसने सागरच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली, या मुद्द्यावर देखील सागरने आईशी संवाद साधला.

घुसखोरीबाबत बोलताना सागर काय म्हणाला?

सागर: आई, घरी सर्व ठीक आहे का, काही अडचण तर नाही ना?

आई: तू काय केलंस?

सागर: आई, मी जे केलं ते बरोबर आहे, ते योग्य आहे. मी कोणाच्या सांगण्यावरून असं केलेले नाही. चौकशीनंतर मला लवकरच सोडण्यात येईल.

सागर: आई, तुझी आणि माही(बहिण)ची काळजी घे. तुम्ही सर्वांनी आपली काळजी घ्या. असं सागर यावेळी म्हणाला.

संसद सुरक्षा भंग प्रकरणात एकूण ६ जण सामील

आतापर्यंत या प्रकरणातील चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर दोघांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, संसद सुरक्षा भंग प्रकरणात ६ जण सामील होते. हे सहा जण रात्री गुरुग्राममध्ये थांबले होते. तिथे त्यांची बैठक झाली. आरोपी विक्रमच्या घरीच हे सहा जण थांबले होते. तिथेच या सहा जणांनी सर्व कट रचला, अशी माहिती देखील पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palazzo Design for Monsoon: पावसाळ्या कम्फर्टेबल आणि स्टायलिश लूकसाठी ट्राय करा हे ७ ट्रेंडी पलाझो डिझाइन्स

AI TECH : लवकरच बाजारात येणार ChatGPT-पावर्ड स्मार्ट स्पीकर , AI Assistant ची लुटता येणार मज्जा

Maharashtra Rain : राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने सांगितला शब्द ना शब्द

Famous Cardiologist: प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टरची आत्महत्या; कारमध्ये आढळला मृतदेह

Thursday Horoscope : पैशाच्या समस्या दूर होतील, ५ राशींच्या व्यक्तींचे कामात बढतीचे योग; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT