Parliament Security Breach Saam TV
देश विदेश

Parliament Security Breach Update : संसदेतील घुसखोरीप्रकरणी सर्वात मोठी कारवाई, 8 कर्मचारी सस्पेंड

Parliament Security Breach News : सुरक्षिततेत हलगर्जीपणा केल्यामुळे लोकसभा सचिवालयातील ८ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. रामपाल, अरविंद, विरदास, गणेश, अनिल, प्रदीप, विमित, नरेंद्र अशी कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

प्रविण वाकचौरे

Parliament Security Breach Update :

नव्या संसदेत काल, बुधवारी देशाला हादरवून टाकणारी घटना घडली. संसदेच्या सुरक्षेतील त्रुटीमुळे २ तरूण थेट लोकसभेत घुसले होते. या तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून थेट सदस्यांच्या बाकावर उड्या मारल्या. त्यानंतर त्यांनी स्मोक कँडल देखील फोडल्या होत्या. या घटनेनंतर प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे.

सुरक्षिततेत हलगर्जीपणा केल्यामुळे लोकसभा सचिवालयातील ८ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. रामपाल, अरविंद, विरदास, गणेश, अनिल, प्रदीप, विमित, नरेंद्र अशी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संसदेचं कामकाज सुरु होता विरोधकाचा गदारोळ

कालच्या घटनेनंतर आज संसदेचे कामकाज सुरू होताच विरोधकांनी सुरक्षेच्या मुद्द्यावरुन गदारोळ सुरू केला. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी खासदारांना संसदीय पास जारी करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. आरोपींकडे भाजप खासदाराने दिलेले पास सापडले होते. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

सुरक्षेतील त्रुटीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांची बैठक झाली आणि या मुद्द्यावर सरकारला कोंडीत पकडण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. 13 डिसेंबर रोजी झालेल्या सुरक्षेनंतर गुरुवारी संसदेत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.

नेमकं काय घडलं?

संसदेत घुसखोरीच्या कटात ६ जण सामील होते, त्यापैकी ५ लोक संसदेत पोहोचले तर एका आरोपीने या सर्वांना त्याच्या घरात राहण्यास मदत केली. लोकसभेत सागर शर्मा यांनी व्हिजिटर गॅलरीतून उडी मारली तर एकाने सभागृहात स्मोक कँडल फोडल्या. याशिवाय अमोल शिंदे आणि नीलम यांनी संसदेबाहेर निदर्शने केली. या चौघांसोबत ललित झा नावाचा तरुणही उपस्थित होता. त्याने संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला आणि चौघांचे मोबाईल घेऊन पळ काढला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदे गटाला झटका, महिला नेत्याचा अजित पवार गटात जाण्याचा निर्णय

पश्चिम महाराष्ट्रात शिंदेंना भाजपचा धक्का, आमदाराच्या भावासह ४० पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र!

Body changes after death: मृत्यूनंतर व्यक्तीचं तोंड अनेकदा का उघडं राहतं?

Arjun Tendulkar : सचिनच्या पावलावर चालत अर्जुनने केला साखरपुडा; वयाचं गुपित ऐकून चाहत्यांमध्ये रंगली चर्चा

Maharashtra Live News Update: रायगडच्या पायथ्याशी जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT