Rahul Gandhi Full Speech In Parliament Monsoon Session Saamtv
देश विदेश

Rahul Gandhi Speech: रावण दोघांचं ऐकायचा; तसेच मोदीही... राहुल गांधी संसदेत तुफान बरसले; वाचा भाषणातील ५ प्रमुख मुद्दे

Rahul Gandhi Full Speech In Parliament Monsoon Session: लष्कराची इच्छा असेल तर एका दिवसात शांतता प्रस्थापित करू शकतात, परंतु सरकारला मणिपूरमध्ये शांतता नको आहे..." असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.

Gangappa Pujari

प्रमोद जगताप, प्रतिनिधी...

Rahul Gandhi Speech In Parliament: मणिपूर हिंसाचार मुद्द्यावरुन विरोधकांच्या INDIA आघडीने संसदेत आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु झाली आहे. आज दुसऱ्या दिवशी कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी संसदेत बोलले. यावेळी राहुल गांधी यांनी अदानी प्रकरण आणि मणिपूर हिंसाचारावरुन मोदी- सरकारवर जोरदार प्रहार केला. (Rahul Gandhi News)

राहुल गांधींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे?

खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर बोलायला सुरुवात केली. यावेळी त्यांनी अदांनींच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला. "गेल्या वेळी जेव्हा मी अदानीजींवर बोललो तेव्हा लोकांना त्रास सहन करावा लागला होता. 'मी आज अदानींवर बोलणार नाही. त्यामुळे भाजप (BJP) नेत्यांनी घाबरण्याची गरज नाही. आज मी मनापासून बोलणार आहे..." असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा अदानी मुद्द्यावरुन तिखट प्रहार केला.

भारत जोडो यात्रेबद्दल काय म्हणाले?

भारत जोडो यात्रेबद्दल बोलताना त्यांनी हा देश समजून घेण्यासाठी मी भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yata) काढल्याचे सांगितले. "या यात्रेदरम्यान मला त्रास झाला. कंटाळा आला पण भेटणारी प्रत्येक व्यक्ती मला ताकद देत होती. या यात्रेच्या तिसऱ्याच दिवशी माझा अहंकार नष्ट झाला असे म्हणत.. या यात्रेमध्ये शेतकऱ्यांनी, महिलांनी, त्यांची दुःख सांगितल्याचे ते म्हणाले.

मणिपूर हिंसाचारावरुन घणाघात..

"काही दिवसांपूर्वी मी मणिपूरला (Manipur) गेलो होतो, पण पंतप्रधान आजपर्यंत गेले नाहीत. कारण मणिपूर त्यांच्यासाठी हिंदुस्थान नाही. मणिपूरमध्ये भारतमातेची हत्या झाली. तुम्ही मणिपूरच्या लोकांना मारून भारत मातेची हत्या केली, तुम्ही देशद्रोही आहात, देशभक्त नाही. त्यामुळे पंतप्रधान मणिपूरला जात नाहीत. आता तुम्ही तेच हरियाणात करत आहात, संपूर्ण देश पेटवण्यात व्यस्त आहात, भारतीय लष्कराची इच्छा असेल तर ते एका दिवसात मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करू शकतात. परंतु सरकारला मणिपूरमध्ये शांतता नको आहे..." असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.

रावणाच्या अहंकारामुळेच लंका जळाली..

यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी "रावण मेघनाथ आणि कुंभकर्ण या दोनचं लोकांचे ऐकायचा. पंतप्रधान मोदीही अमित शहा आणि अदांनींचेच ऐकतात. अशी टीका त्यांनी यावेळी केली. रावणाची लंका हनुमानाने नाही तर त्याच्या अहंकाराने जळाली." असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या या भाषणानंतर संसदेत मोठा गदारोळ झाला. राहुल गांधी यांच्या भारतमातेची हत्या केली.. या वक्तव्यावर भाजप खासदारांनी आक्षेप घेतल्याने गोंधळाचे वातावरण झाल्याचे पाहायला मिळाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Bad Impact: दिवाळीत 'या' 5 चुका मुळीच करू नका, भोगावे लागतील मोठे परिणाम

Maharashtra Live News Update : प्रेमाला विरोध; तरुण तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या परिसरात हळहळ

IND Vs AUS : रोहित-विराटचा कमबॅक फसला, गिल-अय्यरही फ्लॉप; ऑस्ट्रेलियाचा भारतावर सहज विजय

JEE Exam 2026: जेईई मेन्स सेक्शन १ आणि २ परीक्षांच्या तारखा जाहीर, कधीपासून अन् कसं रजिस्ट्रेशन करायचे?

Diwali Skincare Tips: दिवाळीला नॅचरल ग्लो हवा असेल, तर घरातील 'या' सामग्रीने करा फेस मसाज

SCROLL FOR NEXT