Centre is expected to table a key bill in Parliament aimed at protecting the dignity and respect of Vande Mataram. saam tv
देश विदेश

Monsoon Session Bill: मोठी बातमी ! वंदे मातरम्’चा अपमान केल्यास होणार तुरुंगवास; सरकार आणणार कठोर कायदा

Parliament Monsoon Session : २० जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात अनेक महत्त्वाची विधेयके मांडली जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सर्वप्रथम राज्यसभेत 'वंदे मातरम' विधेयक मांडणार आहेत.

Bharat Jadhav

  • २० जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे.

  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह वंदे मातरम् संदर्भातील विधेयक राज्यसभेत मांडू शकतात.

  • राष्ट्रगीताचा अवमान किंवा गायनात अडथळा आणणे गुन्हा ठरवण्याचा प्रस्ताव

पुढच्या तीन दिवसानंतर म्हणजेच २० जुलैपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या काळात अनेक विधेयके मांडली जाणार आहेत, यात 'वंदे मातरम' याबाबतही विधेयक मांडलं जाणार आहे. राष्ट्रगीताचा अवमान करणे किंवा ते गाण्यात अडथळा आणणे हा गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकाचाही समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे विधेयक सर्वप्रथम राज्यसभेत मांडतील.

'वंदे मातरम्'चा अनादर करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर तरतुदींनुसार कारवाई केली जाऊ शकते. आपल्या राष्ट्रगीताला, म्हणजेच 'जन गण मन'ला जो मान दिला जातो, तितकाच मान 'वंदे मातरम्'ला देणे अनिवार्य असणार आहे, अशी तरतूद या विधेयकात करण्यात आलीय.सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारचे रणनीतीकार पूर्णपणे आश्वस्त आहेत की, जेव्हा कधी गरज भासेल, अगदी दोन-तृतीयंश बहुमताची आवश्यकता असलेल्या विधेयकासाठी, तेव्हा सरकारकडे सभागृहात आवश्यक संख्याबळ उपलब्ध असेल. तसेच सरकार डीएमकेच्या (DMK) सदस्यांच्या संपर्कात असल्याचेही वृत्त आहे.

'वंदे मातरम' गाण्यास विरोध केल्यास होणार शिक्षा

या विधेयकानुसार जो कोणी राष्ट्रगीत मुद्दाम अर्ध्यावर थांबवेल, ते गाण्यात व्यत्यय आणेल किंवा अशा सादरीकरणादरम्यान गोंधळ निर्माण करेल, त्याला तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे. याला अलीकडेच मंत्रिमंडळाने मंजुरी दिलीय. हे विधेयक सर्वप्रथम राज्यसभेत मांडले जाणार आहे. याआधी मोदी सरकारने सर्व सरकारी कार्यक्रमांमध्ये 'वंदे मातरम' गाणे अनिवार्य केले होतं

'वंदे मातरम' राष्ट्रगीताचा अपमान करणं हा गुन्हा

लोकसभा सचिवालयाच्या एका बुलेटिननुसार, 'राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंध (सुधारणा) विधेयक, २०२६' हे सादर करण्यासाठी, त्यावर विचार करण्यासाठी आणि ते मंजूर करण्यासाठी सूचीबद्ध करण्यात आले आहे. हे विधेयक 'राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंध कायदा, १९७१' मध्ये सुधारणा करण्याची तरतूद करते. सूत्रांच्या माहितीनुसार, या उपाययोजनेद्वारे 'वंदे मातरम' या राष्ट्रगीताचा अपमान करणे किंवा ते गाण्यात अडथळा आणणे हा शिक्षापात्र गुन्हा ठरवण्याचा सरकारचा मानस आहे.

स्वातंत्र्यलढ्याशी निगडित असलेल्या 'वंदे मातरम्'ला त्याचा योग्य सन्मान देण्यात मागील सरकारे अपयशी ठरले, असे भाजपचे म्हणणे आहे. कारण या गीतातील हिंदू प्रतीकांबाबत मुस्लिमांच्या एका गटाने घेतलेल्या आक्षेपांपुढे त्या सरकारांनी माघार घेतली होती, अशी टीका भाजपनं विधेयकाबाबत माहिती देताना काँग्रेसवर केली केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: देवेंद्र फडणवीसांनी पंतप्रधान व्हावं, महाराष्ट्राची धुरा एकनाथ शिंदेंकडे द्यावी - संजय गायकवाड

Silver Chain Design: दिसायला क्लासी आणि किंमतही बजेटमध्ये, चांदीच्या चैनच्या 'या' 7 आकर्षक डिझाईन्स एकदा नक्की पाहा

Maharashtra Politics: शरद पवारांची पुढची चाल काय? VIDEO

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींची मोफत साडी योजना बंद, वस्त्रोद्योग विभागाकडून शासन निर्णय जारी

खेळता खेळता ३०० फूट खोल बोरवेलमध्ये पडला ४ वर्षाचा चिमुकला अन्... क्षणाक्षणाला धडकी भरवणारे ७ तासांचे थरारक रेस्क्यू ऑपरेशन

SCROLL FOR NEXT