Israel and Hamas War  Saam Tv News
देश विदेश

युद्ध पेटलं, जगणं महागलं! ५ रुपयांचं बिस्किट तब्बल २३०० रुपयांना, बाप-लेकीचा भावूक करणारा VIDEO

Israel and Hamas War : गाझापट्टीत युद्ध पेटल्यानं नागरिकांचं जगणं महागलयं. ५ रुपयांचं पारले बिस्किट गाझापट्टीत चक्क २३०० रुपयांना मिळतयं. मात्र हेच बिस्किट गाझापट्टीत एका व्यक्तीनं आपल्या मुलीसाठी खरेदी केल्यानंतर तिथली भीषणता जगासमोर आलीय.

Prashant Patil

सुप्रीम मस्कर, साम टिव्ही

युद्धाची भीषणता जगाला दाखवणारा, मन सुन्न करणारा हा व्हिडिओ पहा. गाझा पट्टीतील बाप लेकांचा हा व्हिडिओ पाहून जगभरातून हळहळ व्यक्त केली जातेय. गेल्या दीड वर्षांपासून इस्त्राईल आणि हमास यांच्यात युद्ध सुरु आहे, आणि या युद्धाचा सर्वात जास्त फटका बसलाय तो गाझा पट्टीतील सामान्य नागरिकांना. जीवनाश्यक वस्तू अव्वाच्या सव्वा भावाने मिळतायत. अवघ्या ५ रुपयांच्या बिस्कीटसाठी गाझामधील रहिवासी मोहम्मद जवाद यांनी मुलीसाठी तब्बल २४ युरो म्हणजे २३०० रुपये मोजलेत.

गाझा पट्टीतील लोकांवर अशी उपासमारीची वेळ का आली?

सततच्या संघर्षामुळे अन्नधान्याचा तुटवडा

पुरवठा व्यवस्था ढासळल्यानं अन्नधान्याच्या किंमतीत वाढ

परदेशातून येणाऱ्या मदतीवरच गाझामधील लोक निर्भर

लोकांपर्यंत मदत पोहोचत नसून काळ्या बाजारात त्या वस्तुंची खुलेआम विक्री

इस्त्रायल- पॅलेस्टाईन युद्धात गाझातील २० लाख लोकसंख्या पूर्णपणे आंतरराष्ट्रीय मदतीवर अवलंबून आहे. मात्र जवाद यांच्या पोस्टमुळे गाझातील लोकांना मिळणारी मदत अपुरी असून काळ्या बाजारातील एजंट लुट करत असल्याचं चित्र पाहायला मिळतयं. गेली अनेक वर्ष इस्त्रालय- पॅलेस्टाईनमध्ये संघर्षाचं वातावरण आहे आणि यात भरडला जातोय तो तिथला सामान्य माणूस जवाद यांची पोस्ट हे सर्वसामान्याचं अनिश्चित जगणंच अधोरेखित करते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tirgrahi Yog: 50 वर्षांनी सूर्याच्या राशीत बनणार पॉवरफुल त्रिग्रही योग; 3 राशींचं नशीब चमकणार, धनलाभ होणार

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT