Paris Olympics 2024 Saam Digital
देश विदेश

Paris Olympics 2024 : पृथ्वीवर कधी परतणार माहिती नाही! पण अंतराळात भरवलं मिनी ऑलिम्पिक; सुनिता विल्यम्स काय करतेय? पाहा VIDEO

Sunita Williams/NASA Space Station : हेलियमच्या गळतीमुळे भारतीय वंशाची अंतराळवीर सुनिता विल्यमसह शास्त्रज्ञ स्पेश स्टेशन अडकले आहेत. नुकताच त्यांनी स्पेस स्टेशनमध्ये मीनी ऑलिंम्पिक भरवल्याचा व्हिडिओ नासाने प्रसिद्ध केला आहे.

Sandeep Gawade

भारतीय वंशाची अंतराळवीर सुनिता विल्यमसह नासाचे अंतराळवीर स्पेस स्टेशनमध्ये अडकले आहेत. हेलियमच्या गळतीमुळे पृथ्वीवर परतण्याचा त्यांचा कार्यक्रम लांबला आहे. त्यांना परत आणण्याच्या नासाच्या स्टारलाइन मोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. त्यातचं नासाने एक व्हिडिओ शेअर केला ज्यात कठिण परिस्थितीही या अंतराळवीरांनी स्पेश स्टेशनमध्ये मीनी ऑलिम्पिक भरवलं होतं. त्याची प्रात्यक्षिकंही दाखवली आहेत. सुनिता विल्यम खूपच फिट दिसत असून ऑलिम्पिक ज्योत पास करताना दिसत आहे.

6 अंतराळवीरांनी पॅरिस आणि फ्रान्समध्ये इतर ठिकाणी होणाऱ्या ऑलिम्पिक खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मिनी-ऑलिंपिक आयोजित केलं होतं. नासाने 26 जुलै रोजी दोन मिनिटांचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे, ज्यात अंतराळवीर ऑलिम्पिक खेळांची झलक दाखवाताना दिसत आहेत. सुरुवातील ऑलिंपिक ज्योत अंतराळवीर एकमेंकांकडे पास करताना दिसत आहे. गुरुत्वाकर्षण नसतानाही ज्योत पास करताना एक वेगळाच अनुभव जगाला दाखवून दिला आहे.

त्यानंतर अंतराळवीर स्पर्धेसाठी तयारी करतात. एप्स आणि विल्यम्स थोडी कसरत करतात, विल्मोर पाण्याचा तरंगणारा ग्लोब्यूल पिऊन हायड्रेट करतात. ऑर्बिटल गेम्सची सुरुवात बॅरेटने थाळीफेकने केली. त्यानंतर विल्मोर डक्ट गोळाफेकतो तो स्पेश स्टेशनच्या एका बाजूकडून दुसऱ्याबाजूकडे वेगाने जातो. विल्यम्स आणि मॅथ्यू डॉमिनिक जिम्नॅस्टिक करतात, तर एप्स आयएसएस कॉरिडॉरच्या बाजूने धावताना दिसत आहेत. काल्डवेल डायसनने विल्मोर आणि बॅरॅटने लोखंडी बार उचलून त्यांच्या ताकदीचं प्रदर्शन करताना दिसत आहेत.

अंतराळविरांनी दाखवलेली प्रात्यक्षिके खूप साधी वाटत असली तरी गुरुत्वाकर्षण नसलेल्या ठिकाणी ती सादर करण खूपच अवघड असतं. तरीही अंतराळवीरांनी २३व्या ऑलिम्पियाडमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना या प्रात्यक्षिकांमधून शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या नासाच्या सहा अंतराळवीरांव्यतिरिक्त, ISS मध्ये सध्या रशियन अंतराळवीर निकोलाई चब, अलेक्झांडर ग्रेबेनकेन आणि ओलेग कोनोनेन्को आहेत, जे एक्सपिडिशन 71 मिशनचे कमांडर आहेत.

सुनिता विल्यम्स आणि विल्मोर यांचा अपवाद वगळता बहुतेक क्रू मेंबर क सहा महिन्यांच्या ISS मिशनची सेवा करत आहेत, जे 6 जून रोजी एक आठवड्याच्या मुक्कामासाठी बोइंगच्या नवीन स्टारलाइनर कॅप्सूलवर आले होते. मात्र सध्या नासाच्या अभियंत्यांकडून अंतराळयानातील हेलियम गळतीची समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे कक्षेत त्यांचा मुक्का वाढला आहे. नासा आणि बोईंगने अद्याप स्टारलाइनरसाठी प्रस्थान तारीख निश्चित केलेली नसल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिवमध्ये वाघाचा मुक्त संचार, पकडण्यासाठी वनविभागाकडून हालचाली सुरू

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Accident: अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं; बापलेकीचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather : गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात कोसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट; कुठे कसा पाऊस?

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

SCROLL FOR NEXT