Paris Battles Bedbugs Saam Tv
देश विदेश

ढेकुण इन पॅरिस...युद्धस्थितीच जणू, नखापेक्षा लहान ढेकणासाठी सरकारनं आखला मोठा प्लान

Paris Battles Bedbugs: सर्वात आधुनिक देश असलेल्या फ्रान्समध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

Bharat Jadhav

Paris Battles Bedbugs:

फ्रान्स हा युरोपमधील तिसरा सर्वात मोठा देश. एकूण क्षेत्रफळाच्या दृष्टीने युक्रेन आणि रशियाच्या युरोपीय भागानंतर तिसऱ्या क्रमांकावर हा देश आहे. या देशात जगातून सर्वाधिक पर्यटक येत असतात. सर्वात आधुनिक देश असलेल्या फ्रान्समध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या देशावर कोणत्या देशानं आक्रमण केलं नाहीये तर ढेकुण या कीटकानं जेरीस आणलंय. (Latest News)

ढेकुण कीटकांची लाट देशात परसरलीय. ही लाट इतकी मोठी आहे या कीटकाचा नायनाट करण्यासाठी पॅरिसमधील संपूर्ण यंत्रणा कामाला लागलीय. देशातील पॅरिसमधील प्रत्येक घरात ढेकुण या कीटकानं आक्रमण केलंय. पुढील वर्ष पॅरिसमध्ये ऑलिम्पिक खेळाचं आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे येथील आरोग्य आणि सुरक्षितेबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत.

फ्रान्समधील एका आरोग्यावर प्रसारित होणाऱ्या मासिकात म्हटलं होतं की, देशातील जनता ढेकुणमुळे त्रस्त झालीय. नागरिकांना ढेकण्यांचा सामाना फक्त घरात नाही तर सर्व ठिकाणी करावा लागत आहे. रेल्वे, हॉटेल,बस या ठिकाणीही ढेकुणं आक्रमण केलंय. यासर्वांमुळे फ्रान्समधील जनता खूप त्रस्त झाली असून ते सोशल मीडियावर आपलं दु:ख सांगत आहेत. येथील नागरिक स्थानिक वाहतुक असो किंवा वातानुकूलित रेल्वे तेथेही ढेकुण दिसत आहे. लोकं त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

फ्रान्स देशाची राजधानी पॅरिसमध्ये या कीटकाचा प्रादुर्भाव अधिक आहे. फ्रान्सहा या देशात सर्वाधिक पर्यटक येत असतात. त्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यानं देशातील पर्यटन क्षेत्राला देखील फटका बसू शकतो. यामुळे ढेकुण कीटक या देशासाठी डोकेदुखीचा विषय ठरलाय. गेल्या काही दशकांपासून ढेकुण हे जगभरातील अनेक देशात आढळणारे कीटक आहे. त्यात तेथील लोकांच्या घरातील झुरळ कमी झाले आहेत.

झुरळ ढेकुणला नैसर्गिकरित्या नष्ट करू शकणारा शिकारी आहे. दरम्यान फ्रान्समध्ये ढेकुण वाढण्याची शक्यता मार्सेलच्या मुख्य रुग्णालयातील कीटकशास्त्रज्ञ आणि फ्रान्सचे प्रमुख तज्ज्ञ जीन-मिशेल बेरेंजर यांनी वर्तवली होती. दरम्यान ढेकुणाच्या त्रासामुळे देशातील प्रत्येक नागरिक हैरान झालाय. ढेकणांपासून त्यांचे संरक्षण करून देणं हा निवडणुकीचा अजेंडा झालाय. सन २०२२ मध्ये महापौरपदासाठी जे लोक निवडणुकीत उभे राहिले होते ते आपल्या निवडणूक मोहिमांमध्ये या मुद्दाचा समावेश केला होता.

२०१७ ते २०२२ मध्ये ही परिस्थिती खूप वाईट झाली होती. दहापैकी दोन घरांमध्ये ढेकुण झाले होते. हे ढेकुण अस्वच्छ घरे असो किंवा एखाद्या स्वच्छ हॉटेलच्या रुममध्येही आढळत होते. दरम्यान पुढील वर्षी ऑलिम्पिकचं आयोजन केलं जाणार आहे. त्यात ढेकुणची स्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेलीय. ढेकणांचा नायनाट करणं हे आता राजकीय मुद्दा बनलाय.

ऑलिम्पिक सुरू होण्याआधी या कीटकावर नियंत्रण मिळवण्याचा निर्धार पॅरिस सिटीमध्ये झालेल्या बैठकीत करण्यात आलाय. ऑलिम्पिक आणि वाहतूक मंत्री हे अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. मंत्री महोद्यांनी रेल्वे आणि बस चालवणाऱ्यांना ढेकणांवर प्रतिबंध करण्यासाठी उपया-योजना करण्यास सांगितलंय.

परिवहन मंत्री, क्लेमेंट ब्यूने एक्स पोस्ट करत सार्वजनिक वाहतूकदारांना ढेकणांवर प्रतिबंध करण्याचं प्रशिक्षण देणार आहे. तर पॅरिस सिटी हॉलच्या प्रतिनिधींनी पंतप्रधान एलिजाबेथ बोर्न यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी या आठवड्यात कीटकांचा “अडथळा” दूर करण्यासाठी एक राष्ट्रीय टास्क फोर्सची स्थापना करावी अशी विनंती केलीय.

तर पॅरिसचे उपमहापौर इमॅन्युएल ग्रेगोयर यांनी सांगितलं की शहरात कोणीही सुरक्षित नाहीत. राज्य सरकारनं यावर काहीतरी उपाय योजना करावी अशी विनंती त्यांनी केलीय. कारण प्रत्येकांची पेस्ट कंट्रोल करण्याइतपत ऐपत नाहीये.

ग्रेगोयर म्हणाले की, १९५० मध्ये ढेकणांचा नायनाट झाला होता, परंतु आता हे कीटक परत आले आहेत. ते गाद्यामध्ये पण कपडे आणि सामानात असतात. रात्रीच्या वेळी मानवी रक्त पिण्यासाठी ते बाहेर पडतात. या ढेकणांमुळे बहुतेकांना मानसिक त्रास, झोपेची समस्या, चिंता आणि नैराश्य निर्माण होते. ले पॅरिसियन या वृत्तपत्राने ढेकुणवर लेख लिहिलंय त्यांनी या समस्येला “डेमोस्ट्रीक टेरर” असं म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धमकीनंतरही बिग बींचा रविवारचा नियम कायम; चाहत्यांना भेटण्यासाठी शोधली भन्नाट शक्कल

Vastu Tips For Wall Clock: घरात घड्याळ कुठे लावावे? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा कोणती?

Stylish Tops For Women: जीन्सवर कोणत्या प्रकारचे टॉप्स घालावेत? पाहा लेटेस्ट कलेक्शन

Jalgaon Firing: दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांकडून 25 वर्षीय तरुणावर बेछुट गोळीबार, भुसावळ हादरलं!

Co-Ords Sets Dress For Women: दिवाळीनिमित्त महिलांसाठी को-ऑर्ड सेट ड्रेसचे लेटेस्ट 5 पॅटर्न्स

SCROLL FOR NEXT