'ती' परत जिवंत होणार म्हणत 2 महिने घरातच ठेवला मुलीचा मृतदेह Saam Tv
देश विदेश

'ती' परत जिवंत होणार म्हणत 2 महिने घरातच ठेवला मुलीचा मृतदेह

दोन महिन्यांनंतर मृतदेहाची दुर्गंधी सर्वत्र पसरू लागली. यानंतर शेजारी राहणाऱ्या लोकांनी चौकशी केली असता हे प्रकरण समोर आलं आणि त्यानंतर मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - पालकांसाठी, त्यांची मुले ही जगातील सर्वात महत्त्वाची असतात. पालक आपल्या मुलांसाठी काहीही करून जातात. अशा परिस्थितीत, आपल्या मुलांना गमावणे त्यांच्यासाठी वाईट स्वप्नाप्रमाणेच असतात. इंडोनेशियामध्ये (Indonesia) राहणाऱ्या एका जोडप्यालाही आपल्या मुलीला गमवावा लागला. पण त्यानंतर या जोडप्याने जे केले ते धक्कादायक होत. या जोडप्याने आपल्या मृत मुलीचे मृतदेह दोन महिने ती पुन्हा जिवंत होईल या आशेने घरातच ठेवले होते. ही धक्कादायक घटना इंडोनेशियाच्या सेंट्रल जावा येथील पलकरन गावातील घडली आहे. (Parents Kept Dead Body of their daughter For Two Months)

हे देखील पहा -

आपल्या मुलीचे खरंच निधन झाले आहे, या गोष्टीवर या जोडप्याचा विश्वास बसत नव्हता. त्यांनी त्यांची मुलगी आता या जगात नाही ही बाब मान्य करण्यास मुलीच्या पालकांनी नकार दिला. या14 वर्षीय मुलीचे टीबीमुळे निधन झाले होते. यानंतर या जोडप्याने दोन महिने मुलीचा मृतदेह घरातच ठेवला. मात्र, दोन महिन्यांनंतर मृतदेहाची दुर्गंधी सर्वत्र पसरू लागली. यानंतर शेजारी राहणाऱ्या लोकांनी चौकशी केली असता हे प्रकरण समोर आलं आणि त्यानंतर मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तसेच या मुलीच्या पालकांनी तिला जिवंत करण्यासाठी हवन देखील केलं होतं. गावातील लोकांनी या मुलीच्या पालकांना मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी भरपूर वेळ समजावले. मात्र, ते तयार नव्हते. अखेर मुलीचा मृतदेह घराच्या जवळ असलेल्या एका कबरीमध्ये दफन करायला ते तयार झाले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bengaluru Girl Letter To PM Narendra Modi: 'खूप ट्रॅफिक आहे, मला शाळेत जायला उशिर होतो', मुलीचे थेट पंतप्रधान मोदींना पत्र

Maharashtra Live News Update: पुण्यात रोज ८० जणांना होतोय भटक्या कुत्र्यांचा श्वानदंश

Coolie Cast Fees : रजनीकांत ते आमिर खान, 'कुली' चित्रपटासाठी कोणी किती घेतलं मानधन?

Accident : घराचा स्लॅब टाकताना अनर्थ घडला; १४ मजुरांना विजेचा झटका, मजूर मुलाचा मृत्यू

Symptoms of kidney failure: किडनी खराब झाल्यावर पायांमध्ये दिसून येणारे 3 मोठे बदल ओळखा; सामान्य समजून दुर्लक्ष करू नका

SCROLL FOR NEXT