ouka.sam Paragliding Dog Video Instagram/@shamsfilmmaker
देश विदेश

कुत्र्यासह पॅराग्लायडिंग; डॉग लव्हर्ससाठी अप्रतिम Video

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक गोंडस कुत्रा पॅराग्लायडिंग करताना दिसत आहे. हा व्हिडिओ जुना असला तरी जो पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Paragliding Dog Video: 'और ये में आसमान की ऊंचाइयों को छूते हुए चारो तरफ कोहरा ही कोहरा है...' हे वाक्य ऐकल्यावर काय आठवतं? तर पॅराग्लायडिंग (Paragliding) करणाऱ्या एका भारतीय तरुणाचा मजेदार व्हिडिओ. पॅराग्लायडिंगचा असाच एक व्हिडिओ (Viral Video) पुन्हा व्हायरल होतोय. पण यात कुणी तरुण नसून चक्क एक क्यूट डॉग (Dog) आहे. माणसानं पॅराग्लायडिंग करणं हे नॉर्मल आहे, पण कुत्र्यांनं पॅराग्लायडिंग करणं हे नवलंच आहे. हा व्हिडिओ बघताना तुम्हाला हसू आवरता येणार नाही. भाई सौ-दोसौ ज्यादा ले ले पर लॅन्ड करा दे असं तो मनातल्या मनात म्हणत असावा का? असा गंमतीशीर प्रश्न पडतो. (Paragliding with a dog; Wonderful Video for Dog Lovers)

हे देखील पहा -

पॅराग्लायडिंग करणाऱ्या या गोंडस कुत्र्याचं नाव औका (Ouka) आहे. औका याला फिरण्याची भरपूर आवड आहे. त्याचं इन्स्टाग्राम @ouka.sam या नावानं पेजही आहे, ज्यावर त्याचे एक लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. औका हा केवळ ३ वर्षांचा असून @shamsfilmmaker या फिल्ममेकरने त्याला दत्तक घेतलंय. हे दोघेही नेहमी सोबत फिरायला जाणं पसंत करतात.

या व्हिडिओमध्ये एक माणूस आपल्या कुत्र्यासोबत पॅराग्लायडिंग करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये वरच्या बाजूला एक माणूस आहे आणि खाली कुत्र्याला पॅराग्लायडिंग सुरक्षितरीत्या बांधलेलं आहे. व्हिडीओ बघायला खरच खूप छान आणि गंमतीशीर वाटत आहे. व्हिडीओ पाहून असे दिसते की, हवेत वावरताना डॉगीही खूश आहे. त्याला हे स्वप्नापेक्षा कमी वाटत नसावं. सोशल मीडियावर हा व्हिडिओ सर्वांची मने जिंकत आहे. विशेषत: श्वानप्रेमींना हा व्हिडिओ खूप आवडला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आईने प्रियकराच्या मदतीने केली पोटच्या मुलाची हत्या

Fact Check: बाजारात ५५० रूपयांचं कॉईन? १०० आणि ७५ रुपयांचंही कॉईन येणार?

Accident: मुंबईत अपघाताचा थरार! हायवेवर रेस लावणं पडलं महागात, महागड्या पोर्शे कारचा चुराडा; पाहा VIDEO

Besan Ladoo Recipe : ना कडक ना जास्त चिकट; 'असे' बनवा परफेक्ट खमंग बेसनाचे लाडू

Arbaaz Khan Daughter Name : खान कुटुंबात आली प्रिंसेस, अरबाज-शूराने ठेवलं लेकीचं खास नाव

SCROLL FOR NEXT