NEET paper leak accused leaders in politics saam tv
देश विदेश

Railway Paper Leak: पेपर फोडणारेच जनता सेवकाच्या वेशात,माफिया मोकाटच

Railway Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणानं देशभरात आंदोलनं केली जात आहेत. पेपरफुटीची प्रकरणं एकामागून एक होत असतानाच यंत्रणा कोणतंच ठोस पाऊल उचलत नाहीये. इतकंच नव्हे तर हेच आरोपी चक्क आमदार बनून उथळ माथ्यानं फिरत आहेत. हे महाभाग नेमके कोण आहेत? आणि कुठल्या राज्यातले आहेत? पाहूयात यावरचा रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रोहित कदम, साम प्रतिनिधी

नीट पेपरफुटीचा मुद्दा देशभरात गाजत असताना एक धक्कादायक माहिती समोर आलीय. देशभरात विविध राज्यांमधल्या परीक्षांचे पेपर ज्यांनी फोडले ते जेलमध्ये असायला हवे होते. मात्र हे पेपर फोडणारे माफिया चक्क आमदार झाले आहेत. हो तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल. पेपरफुटीतले काही आरोपी चक्क आमदार बनून स्वतःला जनतेचे सेवक म्हणवून घेत आहेत. पाहूयात आमदार बनून उजड माथ्यानं फिरणारे हे महाभाग कोण आहेत पाहूयात.

पेपरफुटी प्रकरणातील पहिले आरोपी बेदी राम उत्तर प्रदेशातील सुहेलदेव भारतीय समाज पार्टी(SBSP)चे आमदार आहेत. आमदार बेदी राम यांच्यावर उत्तर प्रदेश व्यतिरिक्त राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्येही पेपर लीक केल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, बेदी राम यांच्या पक्षाचा सत्ताधारी भाजपला पाठिंबा आहे.

तर दुसरे आरोपी आहेत विपुल दुबे हे सध्या उत्तर प्रदेशातील ग्यानपूर मतदारसंघातून निषाद पार्टीचे आमदार आहेत. विपुल दुबे यांच्यावर 2006 मधील रेल्वे भरती परीक्षेचा पेपर लीक केल्याचा आरोप आहे. या आरोपांनंतर गँगस्टर अॅक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र पेपरफुटीतले शेकडो आरोपी अजूनही मोकाटच आहेत. गेल्या 10 वर्षांत 152 पेक्षा जास्त पेपर फुटूनही आतापर्यंत एकाही दोषीला शिक्षा झालेली नसल्याचा आरोप राहुल गांधींनीही केलाय.

त्यामुळे प्रश्न फक्त पेपरफुटीचा नाहीये, तर इथल्या व्यवस्थेचा आहे. ​जर पेपरफुटी प्रकरणांमध्ये योग्य न्याय मिळत नसेल, आरोपी जामिनावर सुटून यंत्रणाच ताब्यात घेणार असतील तर विद्यार्थ्यांचं भवितव्य कसं सुरक्षित राहणार?, हाच खरा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT