PANCHKULA SCHOOL ATTACK saam tv
देश विदेश

तिसरीतील विद्यार्थ्याचा 6 वर्षाच्या चिमुरडीवर हल्ला; डोक्यात दगड आणि कुंडीच घातली अन् फरफटत... CCTV

Panchkula School Attack Latest News: हरियाणातील पंचकुला येथील संस्कृती मॉडेल स्कूलमध्ये तिसरीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने KG मधील सहा वर्षांच्या चिमुरडीवर दगड आणि कुंडीने हल्ला केला.

Omkar Sonawane

हरियाणातील पंचकुला येथून शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. सेक्टर 20 मधील संस्कृती मॉडेल स्कूलमध्ये तिसरीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने KG मध्ये शिकणाऱ्या चिमूरडीवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थ्याने चिमूरडीवर दगड आणि कुंडीने हल्ला केला. यामध्ये चिमूरडी गंभीर जखमी झाली असून, तिला उपचारांसाठी पंचकुला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारांसाठी चंदीगडमधील PGI रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

बेशुद्ध झाल्यानंतरही हल्ला सुरूच ठेवला

मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या आवारात ही घटना घडली. विद्यार्थ्याने सुरुवातील चिमूरडीवर दगडांनी हल्ला केला. त्यानंतर कुंडी उचलून तिच्या डोक्यात टाकली. ही लहानगी बेशुद्ध झाल्यानंतरही विद्यार्थ्याने तिला सोडले नाही. त्याने तिला काही वेळ फरफटत नेले आणि दगडांनी मारहाण सुरू ठेवल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे शाळेच्या परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेनंतर जखमी चिमुरडीला तातडीने पंचकुला येथील सेक्टर-6 मधील नागरिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिच्यावर प्राथमिक उपचार केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिला चंदीगडमधील PGI रुग्णालयात रेफर करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सेक्टर-20 पोलीस ठाण्याचे प्रभारी यशदीप आणि तपास अधिकारी प्रदीप कुमार पोलीस पथकासह शाळेत दाखल झाले. पोलिसांनी शाळा व्यवस्थापनाकडून घटनेची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच हल्ला करणाऱ्या विद्यार्थ्याच्या आई-वडिलांचीही चौकशी केली जात आहे. एवढ्या लहान वयातील विद्यार्थी असे कृत्य करू कसे शकतो याचा तपास पोलीस करत आहेत.

तर हरियाणाची घटना ताजी असतानाच तिकडे आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील राप्ताडू येथे शाळेच्या वर्गात घुसून एका व्यक्तीने १५ वर्षीय विद्यार्थिनीवर चेनसॉ मशीनने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी ३१ ऑक्टोबरला जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार घडला. या हल्ल्यात दहावीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असून, तिला वाचवण्यासाठी मध्यस्थी करणारी आणखी एक विद्यार्थिनीही गंभीर जखमी झाली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात आरोपी हा जखमी विद्यार्थिनीचा नातेवाईक असल्याचे समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमारांविरोधात 'जनमहाभियोग'

Political News: शिवसेना नेत्यावर गोळीबार प्रकरण, छोटा राजनसह ५ जणांची निर्दोष मुक्तता

RBI Interest Rate : खुशखबर! 5 लाख रुपये गुंतवले तर मिळणार 18 हजारांहून जास्त व्याज! RBI चा मोठा निर्णय

राणा सूर्यवंशीला Y प्लस सुरक्षा कोणी आणि कोणत्या निकषांवर दिली? शिंदे गटाकडून चौकशीची मागणी

Gharkul Yojana : घरकुल योजनेत महिलांना मिळणार नवीन घरासाठी सरकारी अनुदान? नेमकं सत्य काय?

SCROLL FOR NEXT