नवाज शरिफ देशाचे नागरिक नाहीत; पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांचा दावा  Saam Tv
देश विदेश

नवाज शरिफ देशाचे नागरिक नाहीत; पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांचा दावा

पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद (Sheikh Rasheed Ahmad) यांनी म्हटले आहे की, माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Navaj Sharief) आता पाकिस्तानचे नागरिक नाहीत.

वृत्तसंस्था

पाकिस्तानचे गृहमंत्री शेख रशीद (Sheikh Rasheed Ahmad) यांनी म्हटले आहे की, माजी पंतप्रधान नवाज शरीफ (Navaj Sharief) आता पाकिस्तानचे नागरिक नाहीत. ते म्हणाले, माजी पंतप्रधान असल्याने नवाज शरीफ यांच्याकडे राजनायिक पासपोर्ट आहे. ज्याची मुदत 16 फेब्रुवारी रोजी संपली आहे. कालबाह्य झालेल्या पाकिस्तानी पासपोर्टसह नवाज कुठेही प्रवास करू शकत नाही. गृहमंत्री म्हणाले, जर नवाज शरीफ यांना पाकिस्तानात (Pakistan) यायचे असेल तर त्यांना 24 तासांच्या आत पासपोर्ट मिळू शकतो. रशीद म्हणाले की, पाकिस्तानात परतण्यासाठी दूतावास पासपोर्ट जारी करू शकतो.

पाकिस्तानातील भ्रष्टाचाराच्या दोन प्रकरणात दोषी ठरलेले नवाज शरीफ नोव्हेंबर 2019 पासून लंडनमध्ये राहत आहेत. लाहोर उच्च न्यायालयाने त्यांना उपचारासाठी चार आठवडे परदेशात जाण्याची परवानगी दिली होती. त्याचवेळी, पाकिस्तान मुस्लिम लीग (पीएमएल-एन) चे अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे की, त्यांचे भाऊ नवाज शरीफ पूर्णपणे बरे होईपर्यंत लंडनहून परतणार नाहीत. ते म्हणाले, नवाज शरीफ यांच्या बाबतीत, यूके इमिग्रेशन ट्रिब्युनलकडे व्हिसा कालावधी वाढवण्याबाबत अपील करण्यात आले आहे. जोपर्यंत यावर निर्णय होत नाही, तोपर्यंत त्यांचा मुक्काम पूर्णपणे कायदेशीर आहे.

यूके सरकारने नवाझ शरीफ यांचा प्रवास व्हिसा वाढवण्याची विनंती फेटाळल्यानंतर काही दिवसांपूर्वीच शाहबाज शरीफ यांचे हे वक्तव्य आले. मिळालेल्या माहितीनुसार, नवाज शरीफ यांचा सहा महिन्यांचा व्हिसा संपला होता. त्यानंतर त्यांनी आरोग्य कारणास्तव यूकेच्या गृह कार्यालयाला व्हिसा वाढवण्याची विनंती केली होती. मात्र, इमिग्रेशन विभागाने ही विनंती फेटाळली.

विरोधी पक्ष पीएमएल-एन चे अध्यक्ष शाहबाज शरीफ म्हणाले, इम्रान खान सरकारच्या (Imran Khan) वैद्यकीय मंडळानेच नवाज शरीफ यांना उपचारासाठी पाकिस्तानबाहेर जाण्याची परवानगी दिली. तीन वेळा पंतप्रधान असलेल्या शरिफ यांची तब्येत बिघडल्यानंतरही राजकारण करणे दुर्दैवी आहे. आपल्या मोठ्या भावाच्या देशात परत येण्याबाबत शाहबाज म्हणाले, "लंडनमधील डॉक्टरांनी (देशात परत) प्रवास करण्याची परवानगी दिली तरच नवाज शरीफ पाकिस्तानात परततील". व्हिसा वाढवण्याबाबतच्या अपीलवर निर्णय होईपर्यंत ते कायदेशिररित्या यूकेमध्ये राहू शकतात असे त्यांनी सांगितले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

SCROLL FOR NEXT