Pakistani Army Attack sakal
देश विदेश

Pakistani Army Attack: पाकिस्तानी सैन्याचा पंजाब पोलीस ठाण्यावर हल्ला, बेदम मारहाणीचा VIDEO समोर

Pakistani Army Attacked On Punjab Police: पाकिस्तानी लष्कराने पंजाबमध्ये पोलीस ठाण्यावर हल्ला केला. या हल्ल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Rohini Gudaghe

Pakistani Army Attacked On Punjab Police Station News

पंजाब प्रांतातील बहावलनगर जिल्ह्यात पाक लष्कर (Pakistani Army) आणि पोलिसांमध्ये चकमक झाली आहे. यामध्ये पाकिस्तान लष्कराच्या सैनिकांनी पंजाबच्या स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांच्या अत्याचार आणि कारस्थानांमुळे पाकिस्तानी लष्कर नेहमीच चर्चेत (Pakistani Army Attack) आहे. (Latest Marathi News)

पाकिस्तानमध्ये आज असलेली राजकीय आणि आर्थिक अस्थिरता लष्करामुळेच आहे, असं अनेक पाकिस्तानी नागरिकांनी म्हटलेलं आहे. असंच पाकिस्तानी लष्कराने आपल्याच पोलिसांवर केलेल्या अत्याचाराची एक ताजी घटना (Pakistani Army Attacked News) आता समोर आली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी लष्कराने पंजाब पोलिसांच्या पोलीस स्टेशनवर हल्ला केल्याचा दावा केला जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पाकिस्तानी पत्रकार रऊफ लासरासह अनेकांनी X वर पोस्ट लिहून या घटनेबद्दल माहिती दिलेली आहे. मात्र, या व्हिडिओला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळाला (Pakistani Army News) नाही.

पाकिस्तानी लष्कराने पोलिसांना बेदम मारहाण केली आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, चूक पोलिसांची होती. लष्करातील जवानाच्या भावाकडून त्यांनी अवैध शस्त्रे जप्त केले (Pakistani Army Attacked On Punjab Police) होते. यानंतर पाकिस्तानी सैन्याने पंजाबच्या पोलीस ठाण्यावर हल्ला केला. तिथे जो कोणी असेल त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

या घटनेची माहिती पाकिस्तानी पत्रकार रऊफ लासराने X वर एक व्हिडिओ पोस्ट करून दिली आहे. त्यांनी पोस्ट केल्यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यांनी X वर लिहिलंय की, पंजाबमधील भवालनगर येथे मदारिसा पोलीस स्टेशन (Pakistani Army Attack Video) आणि लष्कराच्या जवानांमध्ये चकमक झाली आहे.

रऊफ लासरा X वर पुढे म्हणाले की, गस्तीदरम्यान पोलिसांना लष्करातील कमांडोच्या भावाकडे अवैध शस्त्रे सापडली होती. यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला. त्यानंतर पोलीस (Viral Video News) कर्मचाऱ्यांना पाकिस्तानी जवानांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजीनगरमधील सर्वधर्मीय धार्मिक स्थळावरील सर्व भोंगे उतरवले

मोठी बातमी! राज्यात १५ हजार पोलिसांची पदं भरणार, आजच्या कॅबिनेटमध्ये ४ मोठे निर्णय!

Tips for glowing skin: सणासुदीच्या काळात चेहऱ्यावर ग्लो हवाय? तज्ज्ञांनी दिलेल्या 'या' सोप्या टीप्स वापरून पाहा

New Income Tax Bill: नवीन आयकर विधेयकात काय काय बदललं? ७ नियमांमध्ये झाला मोठा बदल

मोठी बातमी! कल्याण शिळ रोड पुढील २० दिवस वाहतूकीस बंद; पर्यायी मार्ग कोणते?

SCROLL FOR NEXT