Yogi Adityanath Saam Tv News
देश विदेश

UP Election Results 2022: यूपीत योगी विजयाच्या वाटेवर, काँग्रेस, आपच नाही तर पाकिस्तानीही नाराज

उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये योगी आदित्यनाथ यांनाच जनतेने कौल दिल्याचं चित्र आहे.

वृत्तसंस्था

UP Election Results 2022: उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये योगी आदित्यनाथ यांनाच जनतेने कौल दिल्याचं चित्र आहे. यूपीच्या जनतेने भरघोस जनादेश देऊन भाजपला पुन्हा एकदा सत्तेत येण्याची संधी दिली आहे हे निकालावरुन स्पष्ट होत आहे. यानंतर पुन्हा एकदा यूपीची सत्ता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे जाणार आहे. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर उत्तर प्रदेश किंवा देशातच नव्हे, तर शेजारील देश पाकिस्तानातही खळबळ माजली आहे (Pakistani Are Upset With Up Election Results Showing Yogi Adityanath as Winner).

अनेक पाकिस्तानी (Pakistan) लोकांनी व्टिटर सोशल मीडियावर निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे योगींच्या (Yogi Adityanath) विजयाने काँग्रेस आणि आपच नाही तर पाकिस्तानीही दु:खी आहेत.

पाकिस्तानचे सुप्रसिद्ध राजकीय तज्ञ मोशर्रफ जैदी यांनी ट्विटरवर लिहिले की, योगी आदित्यनाथ यांचा यूपीमधील विजय म्हणजे भारत आता आपला मार्ग बदलणार नाही, याची आणखी एक पुष्टी आहे. आता आगामी काळात परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. याबाबत अनेकांनी आधीच इशारा दिला आहे. 2019 नंतरच्या भारतापेक्षाही अधिक शूर आणि लढाऊ भारताशी सामना करण्यासाठी आता पाकिस्तानने तयार असले पाहिजे.

पाकिस्तानमधील एका ट्विटर वापरकर्त्याने, फिडाटो नावाच्या ट्विटर हँडलने लिहिले की, उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपच्या पुन्हा विजयानंतर मुस्लिम विरोधी योगी आदित्यनाथ यांनी नरेंद्र मोदींचे संभाव्य उत्तराधिकारी म्हणून आपले स्थान आणखी मजबूत केले आहे.

याशिवाय, वकास अहमद नावाच्या व्यक्तीने त्याच्या ट्विटर लिहिले की, जर अतिरेक वाढला तर तो उर्वरित दक्षिण आशियामध्येही पसरु शकतो. बांगलादेशात हिंदूंवर कशाप्रकारे कारवाई होते हे आपण अलीकडेच पाहिले. तो पुन्हा पसरला तर अल्पसंख्याकांना अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT