Video: पाकिस्तानात महिलेसोबत घृणास्पद प्रकार; 400 जणांवर गुन्हा दाखल Saam Tv
देश विदेश

Video: पाकिस्तानात महिलेसोबत घृणास्पद प्रकार; 400 जणांवर गुन्हा दाखल

पाकिस्तानच्या क्रुरतेचे अनेक प्रकार जगाला माहिती आहेत. यातील काही घटना जनतेला हादरवून टाकतात.

वृत्तसंस्था

पाकिस्तानच्या क्रुरतेचे अनेक प्रकार जगाला माहिती आहेत. यातील काही घटना जनतेला हादरवून टाकतात. चक्क पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी एक घटना घडली आहे. येथे एका महिलेसोबत तीनेशे ते चारशे लोकांनी घृणास्पद कृत्य केले. महिलेने केलेल्या आरोपानुसार उपस्थित काही लोकांनी तिचे कपडे देखील फाडले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाकिस्तानी लोकांची हिम्मत तर बघा

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडओ पाकिस्तानमधील आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी तिच्या मित्रांसोबत लाहोर येथील मीनार-ए-पाकिस्तान या ठिकाणी टिकटॉक व्हिडीओ बनवत होती. यावेळी काही लोकांनी व्हिडीओतील महिला तसेच तिच्या काही मित्रांवर हल्ला चढावला. गर्दी खूप जास्त असल्यामुळे महिलेला तसेच तिच्या मित्रांना काहीच करता आले नाही. त्यानंतर तेथील लोकांनी महिलेला वर उचलून हवेत फेकले. महिलेला हवेत फेकण्याचा हा संपुर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

400 लोकांविरोधात गुन्हा दाखल

ही घटना घडल्यानंतर महिलेने याविषयी लाहोर पोलिसांकडे तक्रार केली. लाहोर पोलिसांनी या प्रकाराची दखल घेत अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लाहोर पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. व्हिडीओ जगभरात पसल्यामुळे पाकिस्तानविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. पाकिस्तानातील हा प्रकार पाहून नेटकऱ्यांनी पाकिस्तानवर टिका केली आहे. #MinarePakistan हा हॅशटॅग देखील ट्विटरवर ट्रेंडिंग होत आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसामुळे मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर

Janhvi Kapoor: हंडी फोडताना 'भारत माता की जय' म्हणल्यामुळे जान्हवी कपूर ट्रोल; अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर करत सुनावले खडेबोल

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस; अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती, पुरात जीप वाहून गेल्याने ६ जण अडकले

High Blood Pressure : हाय ब्लड प्रेशर तर होणारच नाही शिवाय किडनीही निरोगी राहील, फक्त तुमच्या आहारात या गोष्टींचा समावेश करा

FASTag Annual Pass: मुंबई पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर फास्टॅग पास नाहीच!

SCROLL FOR NEXT