Tragic truck accident near a tunnel in Pakistan’s Khyber Pakhtunkhwa; 15 members of the same family killed, several injured.  saam tv
देश विदेश

Truck Accident: भीषण अपघात; बोगद्याजवळ ट्रक उलटला,एकाच कुटुंबातील १५ जणांचा मृत्यू

Truck Accident In Pakistan: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात एका दुर्दैवी अपघातात, ट्रक उलटल्याने एकाच कुटुंबातील १५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मुख्यशोक व्यक्त करताना, मुख्यमंत्र्यांनी चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.

Bharat Jadhav

  • पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात भीषण ट्रक अपघात झालाय.

  • एका कुटुंबातील १५ जणांचा मृत्यू, ८ ते १० जण गंभीर जखमी झालेत.

  • स्वात मोटरवेवरील बोगद्याजवळ ट्रक उलटल्याने दुर्घटना घडली आहे.

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात मोठा अपघात झाला आहे. यात एकाच कुटुंबातील १५ जणांचा मृत्यू जालाय. पख्तूनख्वा असलेल्या एका बोगद्याजवळ ट्रक उलटल्याने हा अपघात घडला असून १५ जण ठार झालेत तर ८ ते १० जण जखमी झालेत. रेस्क्यू ११२२ आपत्कालीन सेवांच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मलाकंद जिल्ह्यातील स्वात मोटरवेवर हा अपघात झाला.

सर्व बळी स्वातच्या बहरीन तहसीलमधील जिब्राल भागातील आहेत. मृत पावलेले कुटुंब भटक्या जमातीमधील होतं. ते अनेकदा हंगामानुसार वेगवेगळ्या भागात स्थलांतर करत असायचे. अपघाताची माहिती मिळताच, बचाव पथके आणि पोलीस अपघातस्थळी पोहोचले आहेत. बटखेला येथील रुग्णालयात जखमींना आणि मृतांचे मृतदेह पाठवले आहेत. रुग्णालयात डॉक्टरांनी १५ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली, तर आठ जखमींवर उपचार सुरू होते. गंभीर जखमींपैकी चार जणांना नंतर विशेष उपचारांसाठी स्वात येथे हलवण्यात आले आहे.

मृत आणि जखमींमध्ये पुरुष, महिला आणि मुलांचा समावेश आहे. खैबर पख्तूनख्वाचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मुहम्मद सोहेल आफ्रिदी यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या आत्म्यांना शांती मिळावी आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती आणि धैर्य मिळावे अशी प्रार्थना केली. अपघातात जखमी झालेल्यांना लवकर बरे होण्याचीही आफ्रिदीने प्रार्थना केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Pahat: दिवाळी पहाटचा कार्यक्रम पाहायचाय? तर मुंबईतील 'या' ५ ठिकाणांना नक्की भेट द्या

Mumbai Local Train: मुंबई लोकलमध्ये व्हिडिओ कॉलद्वारे प्रसूती यशस्वीरित्या पार पाडणारा रिअल हिरो

Yuvraj Singh : वडिलांना साधा कुर्ता घेत नाही पण 'त्या' बाबाला १५ लाखांचं घड्याळ देतो, युवराज सिंगवर गंभीर आरोप

Election Roll Controversy in Maharashtra: बुलढाण्यात 1 लाख बोगस मतदार?मतदारयाद्यांमध्ये घोळ, आयोग करतंय काय?

Maharashtra Live News Update: मालेगावात किराणा दुकानातून गांजाची विक्री

SCROLL FOR NEXT