India Pakistan Tensions update Saam tv
देश विदेश

India Pakistan Tensions : पाकिस्तानच्या कुरापती कायम; अब्दाली बॅलेस्टिक मिसाइलची चाचणी केल्याचा दावा, क्षमता किती?

India Pakistan Tensions update : पाकिस्तानच्या कुरापती कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. पाकिस्तानने अब्दाली बॅलेस्टिक मिसाइलची चाचणी केल्याचा दावा केलाय.

Vishal Gangurde

पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. पाकिस्तानातील मंत्र्यांकडून भारताविरोधात हिंसक वक्तव्य केली जात आहे. दोन्ही देशातील तणावादरम्यान पाकिस्तानने अब्दाली बॅलेस्टिक मिसाइलची चाचणी केल्याचा दावा केला आहे. या मिसाईलची क्षमता ४५० किलोमीटर इतकी आहे. पाकिस्तानच्या दाव्यामुळे दोन्ही देशांमध्ये आणखी वाद पेटणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

पाकिस्तानने चाचणी केलेल्या बॅलिस्टिक मिसाइलचं नाव अब्दाली आहे. या मिसाईलची चाचणी आर्मी स्टॅटेजिक फोर्सेज कमांड (ASFC)अंतर्गत करण्यात आली आहे. यावेळी पाकिस्तानी सैन्याचे स्टॅटेजिर्क फोर्स कमांडचे कमांडर लेप्टिनंट जनरल मुहम्मद शाहबाज खान आणि स्टॅटेजिक प्लांस विभागाचे डीजी मेजर जनरल शहरयार परवे बट देखील उपस्थित होते. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कारवाई सुरु केली आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या कुरापती सुरु आहेत. पाकिस्तान जाणूबुजून मिसाइलची चाचणी करत असल्याचे संकेत देत आहे. दोन्ही देशातील तणाव वाढण्यासाठी पाकिस्तानच्या कुरापती सुरु आहेत.

पाकिस्तानच्या जनसंपर्क विभागाच्या एका विंगने सांगितलं की, 'मिसाइल चाचणीचा उद्देश हा सैन्य दलाकडून युद्धाच्या तयारीला निश्चित करणे होय. मिसाइलची चाचणी मॉर्डन नेव्हिगेश सिस्टम आणि इतर बाबी तपासण्यासाठी करण्यात आली. ग्लोबल फायरपॉवर रँकिंगनुसार, लष्कराची शक्ती आणि शस्त्र व्यवस्थेबाबत भारत जगातील १४५ देशांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान बाराव्या स्थानावर आहे.

दरम्यान, मिलिट्री वॉच मासिकेच्या माहितीनुसार, भारत टियर २ मिलिट्री पॉवरमध्ये मोडतो. तर पाकिस्तान टियर ३ मिलिट्री पॉवरमध्ये मोडतो. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च संस्थेच्या रिपोर्टनुसार, २०२४ मध्ये भारताने सैन्यावर पाकिस्तानच्या ९ पट अधिक खर्च केला आहे. रिपोर्टनुसार, जगात भारत सैन्यावर पाचवा सर्वाधिक खर्च करणारा देश आहे. भारताने यंदा सैन्यासाठी अर्थसंकल्पात १.६ टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे सैन्यासाठी खर्च ८६.१ बिलियन डॉलरपर्यंत पोहोचला आहे. तर यंदा पाकिस्तानी सैन्याचा खर्च १०.३ बिलियन डॉलर इतका राहिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नंदुरबार जिल्ह्याला येलो अलर्ट...

Krushna Abhishek: अभिषेक बच्चनमुळे या कॉमेडियनने बदलले नाव; अमिताभ बच्चन यांच्यासमोर केला मोठा खुलासा

Mumbai Crime : मुंबई हादरली! तरुणीचा पाठलाग करत हल्ला केला, नंतर तरुणानं स्वतःला संपवलं, नेमकं काय घडलं?

Chhat Puja 2025: छठ पूजेचा मुहूर्त काय? जाणून घ्या तारिख आणि महत्व

Mitali Mayekar: ऑफ व्हाईट लेहंग्यात मितालीचं सौंदर्य खुललं; PHOTO पाहा

SCROLL FOR NEXT