Pakistan PM Shehbaz Sharif Saam
देश विदेश

दहशतवाद कधी थांबेल? भारत तुम्हाला...; पत्रकाराच्या प्रश्नावर पाक पंतप्रधान भडकले, उत्तर न देताच निघून गेले

Pakistan PM Shehbaz Sharif: संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत प्रवेश करताना भारतीय पत्रकाराने त्यांना दहशतवादावर प्रश्न विचारला. मात्र, प्रश्नाचं उत्तर न देता ते तेथून निघून गेले.

Bhagyashree Kamble

  • शरीफ यांना दहशतवादावर प्रश्न विचारण्यात आला.

  • पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं.

  • दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर न देता निघून गेले.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी नुकतेच संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत एक मोठा दावा केला होता. या वर्षी भारत पाक संघर्षात पाकिस्तानी हवाई दलाने भारताची तब्बल सात विमाने पाडली असल्याचं शरीफ म्हणाले. मात्र, शुक्रवारी महासभेच्या सत्रात सहभागी होण्यापूर्वी त्यांना भारतीय पत्रकाराकडून कठीण प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर न देता शरीफ तेथून निघून गेले. याचा व्हिडिओ आता समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.

न्यू यॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात प्रवेश करताच भारतीय वृत्तसंस्था एशियन न्यूज इंटरनॅशनल (ANI) यांनी त्यांना प्रश्न विचारला. 'पाकिस्तान सीमापार दहशतवाद कधी थांबेल?', असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं. 'आम्ही दहशतवादाचा नाश करत आहोत. आम्ही त्याचा पराभव करत आहोत', असं ते म्हणाले.

एएनआयच्या पत्रकाराने पुन्हा एक प्रश्न उपस्थित केला. 'पाकिस्तानी पीएम. भारत तुम्हाला पराभूत करत आहे'. शरीफ यांनी उत्तर दिले नाही. ते थेट महासभेच्या सत्रात उपस्थित राहण्यासाठी गेले.

पाकिस्तानने नेहमीच आरोप फेटाळले आहेत.

पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर न देता निघून जाणे, हे शरीफ यांच्या अस्वस्थ भूमीकेला अधोरेखित करते. सीमापार दहशतवाद हा दोन्ही देशांमधील वादाचा एक प्रमुख स्त्रोत आहे. भारताने पाकिस्तानवर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आणि दहशतवादी संघटनांना आश्रय देण्याचा आरोप सातत्याने केला आहे. दरम्यान, पाकिस्तान सातत्याने हे आरोप फेटाळत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Child growth: मुलाची उंची आणि वजन योग्य आहे का? या महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास वाढीवर होऊ शकतो परिणाम

Thackeray Vs Shinde : ठाकरेंना शिंदेंचा झटका; आता 'सोशल' स्ट्राइक, मुंबईसह महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी शिंदेसेनेत

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

SCROLL FOR NEXT