Pakistan Parliament Viral Video Saam TV
देश विदेश

Pakistan Viral Video: भारत चंद्रावर पोहचलाय, आमची मुले गटारात पडून मरताहेत; पाकिस्तानी संसदेत भारताचं कौतुक

Pakistan Parliament Viral Video : या व्हिडीओत सईद मुस्तफा पाकिस्तानी सरकारवर विविध प्रश्नांवरून टीका करताना दिसून येत आहे. सोबतच ते भारताचं कौतुक देखील करीत आहेत

Satish Daud

वाढत्या महागाईमुळे पाकिस्तानची स्थिती बिकट होत चालली आहे. जनतेचे पोट भरण्यासाठी पाकिस्तानी सरकारला कर्ज घ्यावे लागत आहे. दिवाळखोरीत निघालेल्या पाकिस्तानने देशातील सर्व कंपन्या विकण्याचा निर्णय घेतलाय. व्यवसाय करणं हे सरकारचं काम नाही, असं म्हणत त्यांनी कंपन्यांच्या खासगीकरणाची घोषणा केली आहे.

अशातच पाकिस्तानी नेता खासदार सईद मुस्तफा कमाल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत सईद मुस्तफा पाकिस्तानी सरकारवर विविध प्रश्नांवरून टीका करताना दिसून येत आहे. सोबतच ते भारताचं कौतुक देखील करीत आहेत.

हा व्हिडीओ पाकिस्तानातील संसदेतला आहे. सईद मुस्तफा संसदेत भाषण करताना म्हणतात, "आज जग चंद्राकडे जात असताना कराचीतील गटारात पडून आमची मुले मरत आहेत. आपण जेव्हा टीव्हीवर भारत चंद्रावर पोहोचल्याची बातमी पाहतो, तेव्हा दुसऱ्याच क्षणी कराचीत उघड्या गटारात पडून एका मुलाचा मृत्यू झाल्याची बातमी येते".

'कराची हे पाकिस्तानचे महसूल केंद्र आहे. देशात दोन बंदरे असून दोन्ही कराचीत आहेत. पण गेल्या १५ वर्षांपासून कराचीला शुद्ध पाणी मिळाले नाही. जेव्हा जेव्हा पाणी येते तेव्हा टँकर माफियांकडून कब्जा केला जातो". सईद मुस्ताफा यांनी पाकिस्तानातील मुलांच्या शिक्षणावरूनही सरकारला चांगलंच घेरलं.

एका अहवालाचा हवाला देत सय्यद मुस्तफा कमाल म्हणाले, सिंध प्रांतात सुमारे ७० लाख मुले शाळेत जात नाहीत. राष्ट्रीय स्तरावर ही संख्या सुमारे २.६ कोटी आहे. कराची ही सिंध प्रांताची राजधानी आहे. आमच्याकडे एकूण ४८ हजार शाळा आहेत, परंतु यापैकी ११ हजार शाळा रिकाम्या असल्याची टीका त्यांनी पाकिस्तानी सरकारवर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Rules : बँक खात्यात ठेवावे लागणार 50 हजार रुपये? काय आहे नवा नियम? VIDEO

Mumbai Metro7A: ट्रॉफिकचं नो टेन्शन; दहिसर ते एअरपोर्ट फक्त ५० मिनिटात पोहोचा, जाणून घ्या Metro 7चा मार्ग, तिकीट दर अन् थांबे

रिक्षाचालकांची तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल झाल्यानंतर खळबळ

Shocking : मुंबईचा तरुण लातुरात आला, लाईव्ह येऊन सगळं सांगितलं; नंतर अचानक आयुष्य संपवलं

Sunday Horoscope : संडे ४ राशींसाठी ठरणार धोक्याचा? जाणून घ्यायचं असेल तर वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT