देश विदेश

Indian TV Content in Pakistan : 'कंगाल' झाला, पण सुधारणारच नाही!; भारतीय कार्यक्रम दाखवणाऱ्या टीव्ही चॅनेलवर पाकिस्ताननं केली कारवाई

Pakistan News : पाकिस्तान सुधारणारच नाही! भारतीय कार्यक्रम दाखवणाऱ्या टीव्ही चॅनेलवर केली कारवाई

Satish Kengar

Indian TV Content in Pakistan : पाकिस्तानमध्ये एक असा मोठा वर्ग आहे, ज्यांना भारतीय चित्रपट आणि टीव्ही शो हे खूप आवडतात. यातच अभिनेता सलमान खानची पाकिस्तानमध्ये एक वेगळीच क्रेज आहे. असं असलं तरी लोकांना आवडणाऱ्या या गोष्टींना तेथील सरकार आणि कट्टरतावादी संघटनांचा विरोध आहे.

याशीच संबंधित एक मोठी बातमी आता समोर आली आहे. पाकिस्तान सरकारने भारतीय कंटेंट दाखवणाऱ्या टीव्ही चॅनेल आणि केबल ऑपरेटर्सविरोधात देशव्यापी मोहीम सुरू केल्याचे वृत्त आहे. (Latest Marathi News)

पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन'च्या वृत्तानुसार, केबल टीव्ही ऑपरेटर्सना पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटीने (Pemra) तात्काळ भारतीय कंटेंटचे प्रसारण थांबवण्याचा इशारा दिला आहे.

केबल टीव्ही ऑपरेटर्सनी बेकायदेशीर किंवा बंदी घातलेला घोषित केलेला भारतीय कंटेंट प्रसारित करू नये आणि जेथे ते केले जात असेल, तेथे ते त्वरित थांबवावे, असे आदेशात म्हटले आहे. प्राधिकरणाने म्हटले आहे की, केबल टीव्ही नेटवर्कवर डिस्ट्रिब्युशनसाठी Pemra परवानाधारकांशिवाय इतर कोणत्याही चॅनेलला परवानगी दिली जाणार नाही.

बेकायदेशीर भारतीय चॅनेल प्रसारित करणार्‍या केबल ऑपरेटरद्वारे उल्लंघन केल्याच्या अहवालांवर तिच्या प्रादेशिक कार्यालयांनी मोहीम सुरू केली आहे. प्राधिकरणाने भारतीय चॅनेल प्रसारित करणाऱ्या केबल ऑपरेटरविरोधात कारवाई सुरु केली आहे.

यातच डॉनने आपल्या बातमीत असे म्हटले आहे की, केबल ऑपरेटरद्वारे पाकिस्तानमध्ये प्रतिबंधित भारतीय कंटेंट दाखवणे हे सर्वोच्च न्यायालय आणि पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया नियामक प्राधिकरणाने जारी केलेल्या निर्देशांचे उल्लंघन आहे.

स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटीच्या कराची येथील कार्यालयाने डिजिटल केबल नेटवर्क, होम मीडिया कम्युनिकेशन्स (प्रा.) लिमिटेड, शाहजेब केबल नेटवर्क आणि स्काय केबल यांसारख्या केबल ऑपरेटरवर छापे टाकले. तसेच पाकिस्तानमधील हैदराबाद येथील कार्यालयाने 23 केबल ऑपरेटरवर छापे टाकले आणि 8 नेटवर्क जप्त केले, जे भारतीय कंटेंट प्रसारित करत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

History of Tea: 'चहा' भारतात कधी आणि कसा पोहोचला तुम्हाला माहिती आहे का?

Rohit Sharma: रोहित शर्मा पहिल्या कसोटीला मुकणार! मुलाचा जन्म नव्हे, तर हे आहे मुख्य कारण

EC: भाजप आणि काँग्रेसच्या एकमेकांविरोधात तक्रारी, निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांना बजावली नोटीस

Disha Patani: अभिनेत्री दिशा पाटनीच्या वडिलांची फसवणूक; घातला २५ लाखांचा गंडा, काय आहे प्रकरण?

VIDEO : ... तर आदित्यला बर्फाच्या लादीवर झोपवून मारा, रामदास कदमांचा पलटवार

SCROLL FOR NEXT