Pakistan Airstrike on Afghanistan Google
देश विदेश

Air Strike : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राइक, ९ चिमुकल्यांसह १० जणांचा मृत्यू, तालिबानकडून कडक इशारा

Pakistan Attack on Afghanistan : पाकिस्तानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानमध्ये एअरस्ट्राइक केला. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये ९ मुलांचा समावेश आहे.

Namdeo Kumbhar

  • पाकिस्तानने अफगाणिस्तानवर मध्यरात्री एअरस्ट्राइक करत ९ मुलांसह १० जणांचा बळी घेतला.

  • तालिबानने या हल्ल्याची तिव्र निंदा करून पाकिस्तानला तीक्ष्ण इशारा दिला.

  • पाकिस्तानचा दावा — हा हल्ला अफगाणिस्तानातील टीटीपी दहशतवादी तळांवर लक्ष्य साधण्यासाठी करण्यात आला.

  • दोन्ही देशांमध्ये तणाव पुन्हा वाढला असून सीमाक्षेत्रात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Pakistan Airstrike on Afghanistan Latest News Update : पाकिस्तानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राइक केले. सर्वजण झोपेत असताना रात्री १२ वाजता पाकिस्तानकडून अफगाणिस्तानमध्ये बॉम्ब टाकण्यात आले. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये ९ चिमुकल्यांचा समावेश आहे. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या एअरस्ट्राइकनंतर तालिबानकडून कडक इशारा देण्यात आला आहे.

अफगाणिस्तानचे प्रवक्ते जबीहुल्ला यांनी पाकिस्तानच्या हल्ल्याची निंदा केली. भ्याड हल्ल्याला अफगाणिस्तानकडून उत्तर मिळेल, असे त्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले आहे की, पाकिस्तानने खोस्त आणि कुनार-पाक्तिका या भागात बॉम्ब फेकले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खोस्त प्रांतातील गरबजो जिल्ह्यातील मगलगाई भागात पाकिस्तानी सैन्याने एका स्थानिक नागरिकाच्या घरावर बॉम्बहल्ला केला. या हल्ल्यामध्ये महिलेसह ५ मुले आणि ४ मुलीचा मृत्यू झाला आणि घर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये गेल्या काही महिन्यापासून तणाव सुरू आहे. ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानने अफगाण सीमावर्ती भागात हवाई हल्ला केला होता. त्यामध्ये ३ खेळाडूंचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानी सैन्याने काबूलवर बॉम्बहल्ला केला. अफगाणिस्तानकडून प्रत्युत्तरात हल्ला करण्यात आला. दोन्ही बाजूंमध्ये युद्धबंदी झाली होती. पण पाकिस्तानचे हवाई हल्ले सुरूच आहेत, ज्यावर तालिबानने टीका केली आहे. आज झालेल्या हल्ल्यात लहान मुलांचा मृत्यू झाल्याचा दावा अफगणिस्तानकडून करण्यात आला आहे.

पाकिस्तानकडून एअरस्ट्राइक का?

अफगाणिस्तानात आश्रय घेतलेल्या टीटीपी (तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान) गटाच्या ठिकाणांवर लक्ष करण्यासाठी हल्ला केला जात असल्याचे पाकिस्तानकडून सांगण्यात येत आहे. पाकिस्तानातील पेशावर येथील एका लष्करी तळावर आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात अनेक सैनिक ठार झाले आणि संपूर्ण परिसर हादरला. याआधीही पाकिस्तान उच्च न्यायालयासमोर असाच एक कार बॉम्बस्फोट झाला होता. त्यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानच्या गुप्तचरच्या मते हा हल्ला टीटीपीने केला होता. त्यामुळे पाकिस्तानकडून अफगाणिस्तानमदील टीटीपीवर हल्ला केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात औधमधे अपघात, अपघातात वयोवृद्ध महिला जखमी

ठाकरे गटाच्या खासदाराला 100 कोटींसह केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर, माजी आमदाराचा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ

Tilachi Chutney Recipe : हिवाळ्यात खायलाच पाहिजे, तिळाची पौष्टिक आणि चवदार चटणी!

प्रिन्सिपलच्या छळाला कंटाळली; विद्यार्थिनीनं शाळेतच आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमध्ये लिहिलं 'बॅड टच'

Gauri Garje Death Case: माझ्या मुलीला मारलंय; आत्महत्या नाही तर हत्याच, गौरीच्या कुटुंबीयांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT