Marathi family celebrating Ganeshotsav in Karachi Pakistan saam tv
देश विदेश

पाकिस्तानातही गणपती बाप्पा मोरया, कराचीत मराठी माणसाच्या बाप्पाची चर्चा

Ganpati Bappa Morya in Karachi: जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी माणसाचं अस्तित्व आहे... अशातच मराठी माणूस जगात कुठेही राहायला गेला तरी त्याची मराठी संस्कृती कधीच विसरत नाही.. याचाच प्रत्यय पाकिस्तानातील कराचीत आलाय... नेमकं हे प्रकरण काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Rohit Kadam

संपूर्ण देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. ठिकठिकाणी लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केली जातेय. मात्र पाकिस्तानातही गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळतोय. भारत-पाकिस्तान फाळणीच्या 79 वर्षानंतरही कराचीतल्या एका मराठी कुटुंबानं गणेशोत्सव साजरा करण्याची संस्कृती आणि परंपरा मोठ्या उत्साहानं जपलीये. फाळणीच्या वेळी पाकिस्तानातच थांबलेल्या अमर प्रकाश यांचं कुटुंब भारतात 2002 सालापासून अत्यंत उत्साहात गणेशोत्सव साजरा करतंय. गेली 25 वर्षांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाची खास गोष्ट काय आहे?... तेही पाहूयात...

कराचीतील अमर प्रकाश यांच्या कुटुंबानं गणेश मठ मंदिराची पुनर्बांधणी केली. 2002 पासून अमर प्रकाश गणेश चतुर्थी साजरी करत आहेत. मंदिरातील ही एकसंध संगमरवरी गणपतीची मूर्ती 2008 मध्ये पुण्यातील पिंपरीहून पाकिस्तानात नेण्यात आली. सुमारे 80 किलो वजनाची ही मूर्ती दरवर्षी गणेशोत्सवात विराजमान होते. यंदा 7 दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जातोय. विशेष म्हणजे, बाप्पाच्या मूर्तीचं रंगकाम पाकिस्तानातील मुस्लीम कलाकारानं केलंय.

विशेष म्हणजे, अजानच्यावेळी ढोल-ताशांचा गजर थांबवून इतर धर्मांप्रती आदरही राखला जातो. समाजात सकारात्मकता, प्रेम आणि ऐक्य वाढावे हाच या उत्सवामागील मुख्य उद्देश असल्याचंही अमर प्रकाश सांगतात. खरंतर, ‘श्री महाराष्ट्र पंचायत’सारख्या संस्था आजही तेथील मराठी संस्कृती जपण्यासाठी काम करत आहेत. तर दुसरीकडे, अमर प्रकाश यांनी मराठी संस्कृती जपणाऱ्या गणेशोत्सव आणि इतर हिंदू सणांचे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यामुळे पाकिस्तानसारख्या मुस्लीमबहुल देशात हिंदू सण आणि संस्कृती जपणारं मराठी कुटुंब भारतात चर्चेचा विषय ठरलंय. देश बदलला, पिढ्या बदलल्या… मात्र, अमर प्रकाश यांची बाप्पाशी आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेली नाळ मात्र आजही कायम आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील बीडमध्ये दाखल

महाराष्ट्र सर्वात मोठं बहुभाषिक राज्य, शाहांच्या विधानावरून वाद पेटला

Britain News: देशाचे तीन भागात होणार विभाजन; नेत्यांच्या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या

Fact Check: बुरखाधारी महिलेच्या हातात गणपती बाप्पा? मुंबईत मुस्लीम महिला गणपती घेऊन का फिरतेय?

Sheikh Hasina : ७ नेत्यांना मृत्युदंडाची शिक्षा; शेख हसीना यांना मोठा झटका, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT